दऱ्या खोऱ्यांनी धाडला
काल हिरवा सांगावा
सांग शहरात आता
जीव कसा हा रमावा
हिर्व्या सांगाव्याची भाषा
ओढे सुसाट बोलती
बिजलीच्या मशालीने
रानवाटा उजळती
ढग एकटा चुकार
बघ ओथंबून आला
धरणीला चुंबताना
त्याचा तोल पार गेला
बेड्या अभेद्य पायात
विसरण्या दोन दीस
जिंदगीच्या लोखंडाला
लावू हिरवा परीस
वाचने
115
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम काव्य. अर्थात काल…
उत्तम काव्य. अर्थात काल पडलेला पाऊस कारणीभूत असेल रचनेला.
अन मी पयला.