Skip to main content

निसर्ग

औद्योगिकरणाच्या विमानाचे कोसळणे टाळा

लेखक nanaba यांनी मंगळवार, 29/05/2018 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
औद्योगिकरणाच्या विमानाचे कोसळणे टाळा. औद्योगिकरणाचे विमान मानवजातीला व जीवसृष्टीला विनाशाकडे वेगाने नेत आहे. ते कोसळणार हे तर निश्चित आहे. ते कोसळण्याआधी सुरक्षितपणे उतरवावे. थोडक्यात क्रॅशलॅडिंग टाळावे. ते, त्यातील प्रवासी म्हणजे मानवजात वाचवण्यासाठी आवश्यक आहे. औद्योगिकरण थांबण्याबाबतची भीती अनाठायी आहे. आजही औद्योगिकरण कुणालाही जगवत नाही. इतर प्राणिमात्रांप्रमाणेच मानवही हवा पाणी व अन्नामुळे जगतो. औद्योगिक उत्पादनांमुळे नाही. औद्योगिकरणामुळे जीवन संपुष्टात येणार हे नक्की झाल्यावरही ते चालू ठेवणे यामागे औद्योगिकरण जगवते असा निर्माण झालेला गैरसमज कारण आहे. आपण करोडो वर्ष पृथ्वीवर आहोत.

मुंबई नेव्हर सेटल्स

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 03/09/2017 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा: http://www.apurvaoka.com/2017/09/mumbai-spirit-monsoon.html "काहीही म्हण हं, मुंबई नेव्हर स्टॉप्स" "काहीही म्हण हं, मुंबईच्या स्पिरिटला तोड नाही" "काहीही म्हण हं, अशा वेळी माणुसकी दिसते" असे संवाद गेले दोन दिवस ऐकायला येतायत, आणि प्रश्न पडतायत की, हे 'काहीही' जे आहे ते कधी म्हणायचं?, 'अशी वेळ' नसते तेंव्हा कुठे जातं हे 'स्पिरिट'? आणि शुड मुंबई नेव्हर स्टॉप? सोशल मिडिया वरच्या असंख्य संदेशांनी डोकं भंडावून सोडलं होतं.