Skip to main content

परीस

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 23/05/2026 09:32 या दिवशी प्रकाशित केले.

दऱ्या खोऱ्यांनी धाडला
काल हिरवा सांगावा
सांग शहरात आता
जीव कसा हा रमावा

हिर्व्या सांगाव्याची भाषा
ओढे सुसाट बोलती
बिजलीच्या मशालीने
रानवाटा उजळती

ढग एकटा चुकार
बघ ओथंबून आला
धरणीला चुंबताना
त्याचा तोल पार गेला

बेड्या अभेद्य पायात
विसरण्या दोन दीस
जिंदगीच्या लोखंडाला
लावू हिरवा परीस

लेखनविषय:

वाचने 115
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया