Skip to main content
लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 07/09/2025 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
कविता-रतीचे | विभ्रम अनंत तयांचे गणित | कैसे करू? तरीही करितो | वेडे हे धाडस माझ्या अक्षरांस | हासू नये :) ~~~~~~~~~~~ कधी बेरीज बेचैनीची कधी वास्तव वजावटीस कधी गुणाकार गहनाचा कधी भागे कवी शून्यास कवितेचे गणित कसे हे उत्तर ना त्याचे कळते ओळींच्या मधली जागा गणिताला डिवचून जाते गणिताच्या मर्यादांचा ज्या कुणी(@) लाविला शोध तो कवी नसावा हृदयी याचा नच उरतो खेद ~~~~~~~~~~~ @ Kurt Gödel is well-known for his incompleteness theorems, which showed inherent limitations of formal mathematical systems.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1472
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

विनंतीस मान देऊन तुंम्ही कविता लिहिली. कसं जमतं बुवा? कधी बेरीज बेचैनीची कधी वास्तव वजावटीस कधी गुणाकार गहनाचा कधी भागे कवी शून्यास हे खासच...