Skip to main content

आसवांचे थेंब येता तुझ्या गालावरी

लेखक Deepak Pawar यांनी रविवार, 07/05/2023 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
आसवांचे थेंब येता तुझ्या गालावरी दाटले आभाळ हे बरसुनी गेल्या सरी. वादळे येतील तेव्हा नको तू घाबरू दुःख सारी ती तुझी उधळ तू वाऱ्यावरी. दाटुदे अंधार सारा जरी हा भोवती नांदतो हा चांद आता तुझ्या भाळावरी. पूस डोळे हास, ढाळू नको ही आसवे आसवांचा थेंब ना शोभतो गालावरी. हात घे हातात हा सोड साऱ्या वंचना ठेव तू विश्वास आता सखे माझ्यावरी.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3910
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

याला म्हणतात कमिटमेंट. आवडली.

कविता छान आहे. त्यातील भावना छान आहेत. ती वाचून दोन दोन शब्दांत ती पुन्हा मांडण्याचा प्रयत्न करावासा वाटला. त्यावरून ती कल्पना सुंदर आहे हेच अधोरेखित होते. उदा. खालील काहीसे : आसवांचे थेंब तुझ्या गालावर दाटले आभाळ कोसळली सर वादळ येता भीती विसर दुःखे सारी लोट वाऱ्यावर लिहीत रहा.

दाटुदे अंधार सारा जरी हा भोवती नांदतो हा चांद आता तुझ्या भाळावरी.
आवडल्या या ओळी! छान उपमा! (भाळावरील चंद्र, कुंकू)

कर्नलतपस्वी सर, गवि सर, श्रीगणेशा सर मनःपूर्वक धन्यवाद. गवि सर कविता छान आहे.

कविता आवडली. हात घे हातात हा सोड साऱ्या वंचना ठेव तू विश्वास आता सखे माझ्यावरी. हे विशेष आवडले.

हात घे हातात हा सोड साऱ्या वंचना ठेव तू विश्वास आता सखे माझ्यावरी. आवडली रचना. -दिलीप बिरुटे

वाह!