रंग पाण्यास ना, हे तसे चेहरे
थांग लागेच ना मन किती गहिरे
व्देष माडापरी, प्रेम झाले थिटे
चेहर्यावर इथे मुखवटे... मुखवटे.
पुण्य गेले कुठे, पाप शिरजोर हे
सभ्य वेषात या नांदती चोर हे
दान देण्या निघे अन जगाला लुटे
चेहर्यावर इथे मुखवटे... मुखवटे.
शब्द फुलापरी मनी निखारा जळे
वेष संतापरी हृदयी विषारी तळे
लुच्चे फिरती इथे साव गेले कुठे
चेहर्यावर इथे मुखवटे... मुखवटे.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4481
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
छानच
मस्त.
उत्तम रचना.
अरे वाह !
मनःपूर्वक धन्यवाद.
छान!
मनःपूर्वक आभार.
In reply to छान! by राघव
मस्त कविता
मनःपूर्वक आभार.
In reply to मस्त कविता by ज्ञानोबाचे पैजार
रंग पाण्यास ना, हे तसे चेहरे
मनःपूर्वक धन्यवाद.
In reply to रंग पाण्यास ना, हे तसे चेहरे by श्रीगणेशा
आवडली खूप छान
मनःपूर्वक आभार.
In reply to आवडली खूप छान by बाजीगर