Skip to main content

(वल्लीदांच्या सहवासात)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 14/01/2022 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाला चांदण्यांच्या सहवासात रमावेसे वाटते तर कुणाला अजून कोणाच्या, आमची एक इच्छा अपूर्ण आहे ती म्हणजे एकदिवस तरी वल्लीदांच्या सहवासात रमण्याची बघू केव्हा पूर्ण होते ती? तोपर्यंत ह्या कवितेवरच समाधान मानावे...

(वल्लीदांच्या सहवासात)

वाटते जरा रमावे वल्लीदांच्या सहवासात गुपित एकेक उलगडावे वल्लीदांच्या सहवासात लेण्यात एखाद्या शिरावे वल्लीदांच्या सहवासात दर्पण सुंदरीला पहावे वल्लीदांच्या सहवासात वल्लीदांनीच बोलावे वल्लीदांच्या सहवासात आपण फक्त ऐकत राहावे वल्लीदांच्या सहवासात एक एक लेणे निरखावे वल्लीदांच्या सहवासात वल्लीदांच्या नजरेने पहावे वल्लीदांच्या सहवासात माहिती कानात साठवावी वल्लीदांच्या सहवासात घड्याळाकडे बघू नये वल्लीदांच्या सहवासात गोष्टी किती ऐकाव्या वल्लीदांच्या सहवासात सुरताल असा जुळवा वल्लीदांच्या सहवासात पैजारबुवा, हि कविता वाचल्यावर कोणाच्या पोटात जर आमच्या गुर्जींच्या सहवासात रहायची कळ उठली तर त्यांनी तो कढ कृपया दाबून धरावा

वाचने 12281
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

वल्लींच्या सहवासात, मुर्ती पण बोलू लागतात . काही लोकं सुतावरून स्वर्ग गाठतात... वल्ली, तुटलेल्या अंगठ्या वरून, शिव-पार्वती कथा सांगतात ...

In reply to by मुक्त विहारि

अगदी. लेण्यातल्या मूर्तीचा तुटलेला हात आपल्याला दिसत असतो. वल्लीशेठच्या नजरेने मात्र त्या हातासकट ती मूर्ती अखंड कोरून नव्यासारखी समोर उभी केलेली असते.

वल्ली ऊर्फ प्रचेतस ऊर्फ काहींसाठी प्रचु डार्लिंग तर काहींसाठी वल्लीसर.. हे व्यक्तिमत्व म्हणजे अगदी राजा माणूस. स्वभावाला औषध नाही म्हणतात ते वगळता बाकी ज्ञानसंपन्न उमदे व्यक्तिमत्व. रेडासदृश दुचाकी अवजड वाहनावर बसून एक ते विशिष्ट पांडवकालीन जॅकेट घालून श्री रा रा प्रचेतस पुरानकालीन दगडधोंड्यांच्या भ्रमंतीस निघाले की सातवाहन, मौर्य वगैरे सर्वकालीन काळ जिवंत होऊन उठतो वगैरे म्हणतात मागे बसणारे. मिपा माध्यमातून एक सामान्य वाचक या भूमिकेतून मा. प्रचु यांचा जितका परिचय आहे त्यानुसार सज्जन असावेत असे वाटते. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

In reply to by गवि

वल्लीसरांच्या सहवासात भ्रमंतीचा योग आमच्या नशीबात येवो, ही बुवांच्या चरणी प्रार्थना..

In reply to by गवि

सज्जनच आहेत... स्वानुभव आहे.. पण, जोडीला अतृप्त आत्मा, असले तर, कट्टा जास्त रंगतदार होतो..

In reply to by मुक्त विहारि

आमचं असं धुबुक धुबुक चालतं.. =))))) आगोबा--आत्मा http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-pillow-fight-games-smiley-emoticon.gif

In reply to by गवि

तसा मिपावर बहुतेक सर्वात मीच वयाने लहान असेल पण प्रचेतस यांचे लेख वाचून त्यांचे व्यक्तिमत्व आणी आवाका किती मोठा आसेल याची कल्पना येते.

In reply to by गवि

त्यानुसार सज्जन असावेत असे वाटते.
सज्जन आहेतच, आता व्यक्ती म्हटलं की स्वभाव गुण दोष चालायचेच. पण त्यांच्या लेखनाचा एक वाचक म्हणून चाहता आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by कंजूस

अर्रर्र.....बुद्धीबळ खेळणं सोडलं मी.... उगाच आपण हरल्यानंतर ते चार मित्रांना, कसं हरवलं त्याचं विश्लेषण करुन सांगतात. -दिलीप बिरुटे

@हि कविता वाचल्यावर कोणाच्या पोटात जर आमच्या गुर्जींच्या सहवासात रहायची कळ उठली तर त्यांनी तो कढ कृपया दाबून धरावा >>> http://www.sherv.net/cm/emoticons/playful/angry-tongue-sticking-out-smiley-emoticon.gif दु दु दु दु पै बुवा http://www.sherv.net/cm/emoticons/war/jeep-shooting.gif

व्वा, पैजारबुवा, जबरी जमली आहे रचना ! टाळ्या ..... ! ertr546vas आम्हा सगळ्या मिपाकरांची भावना व्यक्त केलीत ! दिग्गज मिपाकर वल्ली उर्फ प्रचेतस यांना मानाचा मुजरा ! त्यांच्या समावेत भटकंतीचा योग लवकरात लवकर येवो !

In reply to by सतिश गावडे

गावडे सरांना अगदी राहवलं नाही. मिपा संन्यास सोडावासा वाटला, यातच वल्लीसरांचे मोठेपण दिसते. :)))