✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(वल्लीदांच्या सहवासात)

ज — ज्ञानोबाचे पैजार, Fri, 01/14/2022 - 09:19
कुणाला चांदण्यांच्या सहवासात रमावेसे वाटते तर कुणाला अजून कोणाच्या, आमची एक इच्छा अपूर्ण आहे ती म्हणजे एकदिवस तरी वल्लीदांच्या सहवासात रमण्याची बघू केव्हा पूर्ण होते ती? तोपर्यंत ह्या कवितेवरच समाधान मानावे...

(वल्लीदांच्या सहवासात)

वाटते जरा रमावे वल्लीदांच्या सहवासात गुपित एकेक उलगडावे वल्लीदांच्या सहवासात लेण्यात एखाद्या शिरावे वल्लीदांच्या सहवासात दर्पण सुंदरीला पहावे वल्लीदांच्या सहवासात वल्लीदांनीच बोलावे वल्लीदांच्या सहवासात आपण फक्त ऐकत राहावे वल्लीदांच्या सहवासात एक एक लेणे निरखावे वल्लीदांच्या सहवासात वल्लीदांच्या नजरेने पहावे वल्लीदांच्या सहवासात माहिती कानात साठवावी वल्लीदांच्या सहवासात घड्याळाकडे बघू नये वल्लीदांच्या सहवासात गोष्टी किती ऐकाव्या वल्लीदांच्या सहवासात सुरताल असा जुळवा वल्लीदांच्या सहवासात पैजारबुवा, हि कविता वाचल्यावर कोणाच्या पोटात जर आमच्या गुर्जींच्या सहवासात रहायची कळ उठली तर त्यांनी तो कढ कृपया दाबून धरावा

प्रतिक्रिया द्या
12123 वाचन

💬 प्रतिसाद (23)

सहमत आहे

मुक्त विहारि
Fri, 01/14/2022 - 09:34 नवीन
वल्लींच्या सहवासात, मुर्ती पण बोलू लागतात . काही लोकं सुतावरून स्वर्ग गाठतात... वल्ली, तुटलेल्या अंगठ्या वरून, शिव-पार्वती कथा सांगतात ...
  • Log in or register to post comments

अगदी.

गवि
Fri, 01/14/2022 - 10:33 नवीन
अगदी. लेण्यातल्या मूर्तीचा तुटलेला हात आपल्याला दिसत असतो. वल्लीशेठच्या नजरेने मात्र त्या हातासकट ती मूर्ती अखंड कोरून नव्यासारखी समोर उभी केलेली असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

गवि>>>> +++++1111111

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/14/2022 - 22:50 नवीन
गवि>>>> +++++1111111 Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

धन्य आहात माऊली __/\__

प्रचेतस
Fri, 01/14/2022 - 10:06 नवीन
धन्य आहात माऊली __/\__
  • Log in or register to post comments

वल्ली ऊर्फ प्रचेतस ऊर्फ

गवि
Fri, 01/14/2022 - 10:28 नवीन
वल्ली ऊर्फ प्रचेतस ऊर्फ काहींसाठी प्रचु डार्लिंग तर काहींसाठी वल्लीसर.. हे व्यक्तिमत्व म्हणजे अगदी राजा माणूस. स्वभावाला औषध नाही म्हणतात ते वगळता बाकी ज्ञानसंपन्न उमदे व्यक्तिमत्व. रेडासदृश दुचाकी अवजड वाहनावर बसून एक ते विशिष्ट पांडवकालीन जॅकेट घालून श्री रा रा प्रचेतस पुरानकालीन दगडधोंड्यांच्या भ्रमंतीस निघाले की सातवाहन, मौर्य वगैरे सर्वकालीन काळ जिवंत होऊन उठतो वगैरे म्हणतात मागे बसणारे. मिपा माध्यमातून एक सामान्य वाचक या भूमिकेतून मा. प्रचु यांचा जितका परिचय आहे त्यानुसार सज्जन असावेत असे वाटते. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

वा!!

तुषार काळभोर
Fri, 01/14/2022 - 10:47 नवीन
वल्लीसरांच्या सहवासात भ्रमंतीचा योग आमच्या नशीबात येवो, ही बुवांच्या चरणी प्रार्थना..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

सज्जन असावेत असे वाटते.

मुक्त विहारि
Fri, 01/14/2022 - 10:50 नवीन
सज्जनच आहेत... स्वानुभव आहे.. पण, जोडीला अतृप्त आत्मा, असले तर, कट्टा जास्त रंगतदार होतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आमचं असं धुबुक धुबुक चालतं..

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/14/2022 - 22:57 नवीन
आमचं असं धुबुक धुबुक चालतं.. =))))) आगोबा--आत्मा Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सहमत आहे

कर्नलतपस्वी
Fri, 01/14/2022 - 14:40 नवीन
तसा मिपावर बहुतेक सर्वात मीच वयाने लहान असेल पण प्रचेतस यांचे लेख वाचून त्यांचे व्यक्तिमत्व आणी आवाका किती मोठा आसेल याची कल्पना येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

सहमती आहेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/14/2022 - 19:47 नवीन
त्यानुसार सज्जन असावेत असे वाटते.
सज्जन आहेतच, आता व्यक्ती म्हटलं की स्वभाव गुण दोष चालायचेच. पण त्यांच्या लेखनाचा एक वाचक म्हणून चाहता आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पण

कंजूस
Fri, 01/14/2022 - 11:36 नवीन
थंडरबोल्ट नै हो अमच्याकडे.
  • Log in or register to post comments

आवडलं काव्य

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/14/2022 - 19:48 नवीन
बाकी वल्ली दादांच्या सहवासातलं काव्य थेट भिडलं. =) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

फक्त त्यांच्याशी

कंजूस
Fri, 01/14/2022 - 20:00 नवीन
बुद्धिबळाचा डाव नाही टाकायचा. ते आपल्याला हरवत नाहीत.
  • Log in or register to post comments

मी सोडून दिलं....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/14/2022 - 20:14 नवीन
अर्रर्र.....बुद्धीबळ खेळणं सोडलं मी.... उगाच आपण हरल्यानंतर ते चार मित्रांना, कसं हरवलं त्याचं विश्लेषण करुन सांगतात. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

हाहा

उन्मेष दिक्षीत
Fri, 01/14/2022 - 21:17 नवीन
बघितलं होतं एकदा इथंच विश्लेषण लॉकडाऊन पिरियड मधे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

@हि कविता वाचल्यावर कोणाच्या

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/14/2022 - 22:53 नवीन
@हि कविता वाचल्यावर कोणाच्या पोटात जर आमच्या गुर्जींच्या सहवासात रहायची कळ उठली तर त्यांनी तो कढ कृपया दाबून धरावा >>> Image removed. दु दु दु दु पै बुवा Image removed.
  • Log in or register to post comments

भावना व्यक्त केलीत !

चौथा कोनाडा
Sat, 01/15/2022 - 13:06 नवीन
व्वा, पैजारबुवा, जबरी जमली आहे रचना ! टाळ्या ..... ! Image removed. आम्हा सगळ्या मिपाकरांची भावना व्यक्त केलीत ! दिग्गज मिपाकर वल्ली उर्फ प्रचेतस यांना मानाचा मुजरा ! त्यांच्या समावेत भटकंतीचा योग लवकरात लवकर येवो !
  • Log in or register to post comments

आम्ही भाग्यवंत...

सतिश गावडे
Sat, 01/15/2022 - 13:07 नवीन
प्रत्येक ओळीत उल्लेख केलेला अनुभव घेतला आहे वल्लीदांच्या सहवासात :)
  • Log in or register to post comments

गावडे सरांना अगदी राहवलं नाही

शाम भागवत
Sat, 01/15/2022 - 17:26 नवीन
गावडे सरांना अगदी राहवलं नाही. मिपा संन्यास सोडावासा वाटला, यातच वल्लीसरांचे मोठेपण दिसते. :)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

पक्षी दरी

अत्रुप्त आत्मा
Mon, 01/17/2022 - 14:08 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

वाह पैजारबुवा,

Bhakti
Sat, 01/15/2022 - 13:14 नवीन
वाह पैजारबुवा, द प्रचेतस उर्फ द वल्लीदांवर छान काव्य !
  • Log in or register to post comments

हा योग

चांदणे संदीप
Sat, 01/15/2022 - 15:12 नवीन
लवकरच आमच्या (म्हणजे माझ्या) नशीबी येवो. सं - दी - प
  • Log in or register to post comments

वा, कधी नेताय सहवासात?

पाषाणभेद
गुरुवार, 01/27/2022 - 06:49 नवीन
वा, कधी नेताय सहवासात?
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा