सांज फुले
लेखनविषय:
काव्यरस
सांज फुलांनी भरू दे
काळोखा रंग सावल्यांत उतरू दे
धूसर झाली मावळतीची वाट
मोहरला लाल केशरी क्षितिजाचा तट
पंखात घेऊन भोवतीची वारे
परतू लागली चुकार पाखरे
सूर्य मिटून राने अंधारली
प्रकाशज्योत अलगद विजून गेली
अंबरी आकार घेई अर्धी चंद्रकोर
रात्र पावलाने पुढे येई हळुवार
वाचने
3211
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
सुंदर काव्य!
In reply to सुंदर काव्य! by श्रीगुरुजी
धन्यवाद
सरळ आणि तरल कविता...
In reply to सरळ आणि तरल कविता... by संगणकनंद
धन्यवाद
रात्र पावलाने पुढे येई हळुवार
छान! आवडली कविता.
एकदम चित्रमय काव्य!!
सर्वांचे मनापासून आभार