Skip to main content

सांज फुले

लेखक चांदणशेला यांनी रविवार, 03/10/2021 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
सांज फुलांनी भरू दे काळोखा रंग सावल्यांत उतरू दे धूसर झाली मावळतीची वाट मोहरला लाल केशरी क्षितिजाचा तट पंखात घेऊन भोवतीची वारे परतू लागली चुकार पाखरे सूर्य मिटून राने अंधारली प्रकाशज्योत अलगद विजून गेली अंबरी आकार घेई अर्धी चंद्रकोर रात्र पावलाने पुढे येई हळुवार
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3221
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

अगदी सहज साध्या शब्दांतून किती सुंदर वर्णन केले आहे संध्याकाळचे. आवडली कविता.