✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

या अशा कुंठीत वेळी

अ — अनन्त्_यात्री, Sat, 04/03/2021 - 15:55
एकही कविता आताशा काळजाला भिडत नाही शब्द मोहक विभ्रमांनी  भ्रमित आता करीत नाही कोरडा असतो किनारा  लाट फुटते मत्त तरिही जखम होते खोलवर पण  रक्त आता येत नाही प्रार्थनांचे मंत्र निष्प्रभ,  बीजअक्षर श्रांतलेले भंगलेल्या देवतांना  आळवूनी भ्रष्टलेले मार्गदर्शी ध्रुव अन्  सप्तर्षी आता लोपलेले दीपस्तंभांचे दिवेही  भासती मंदावलेले या अशा कुंठीत वेळी दाटुनी येते मनी विफलता, जी रोज उरते  रोमरोमा व्यापुनी एक आशा तेवते या घनतमी रात्रंदिनी शृंखला पायातल्या तुटतील कधितरी गंजुनी

प्रतिक्रिया द्या
3621 वाचन

💬 प्रतिसाद (8)

मस्त टिपली आहे मनोवस्था...

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 04/03/2021 - 16:59 नवीन
अशा क्लांत वेळी सैरभैर मन आवरताना, बालरवी खुदकन हसतो क्षितिजा मागून डोकावताना मग परत एकदा चालू लागतो तेजोमय ती वाट अनंत प्रशांत मनी आता न उरते हर्ष खेद ना कुठली खंत पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

हे खूप आवडलं

आगाऊ म्हादया......
Sun, 04/04/2021 - 08:58 नवीन
कोरडा असतो किनारा लाट फुटते मत्त तरिही जखम होते खोलवर पण रक्त आता येत नाही
  • Log in or register to post comments

कोरडा असतो किनारा

गणेशा
Sun, 04/04/2021 - 11:04 नवीन
कोरडा असतो किनारा लाट फुटते मत्त तरिही जखम होते खोलवर पण रक्त आता येत नाही वाह...
  • Log in or register to post comments

जखम होते खोलवर पण रक्त आता येत नाही

तुषार काळभोर
Sun, 04/04/2021 - 11:23 नवीन
जखम होते खोलवर पण रक्त आता येत नाही >> 'आता सगळं संपलं. आता लढून काही उपयोग नाही. आता प्रयत्नांचाही उपयोग नाही' अशी स्थिती जाणवते या ओळींतून. असं कसं चालेल? कधी जीवनात अशी परिस्थिती आली, की हा विचार करायचा.. दिवसही कायमचा नसतो, अन रात्रही. पौर्णिमासुद्धा नाही अन् अमावस्या सुद्धा नाही.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद देणार्‍या

अनन्त्_यात्री
Sun, 04/11/2021 - 19:14 नवीन
सर्व कवितारसिकांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments

चांगली रचना.

राघव
Sun, 04/11/2021 - 19:30 नवीन
चांगली रचना.
जखम होते खोलवर पण रक्त आता येत नाही
येथे "रक्त" च्या ऐवजी "दर्द" या अर्थाचा मराठी शब्द हवा खरंतर. अवांतरः
या अशा कुंठीत वेळी
मोकलाया वाचून अशी कुंठीत अवस्था झालेली आठवते. :-)
  • Log in or register to post comments

हेच हवं

सरीवर सरी
Tue, 04/13/2021 - 23:10 नवीन
एक आशा तेवते या घनतमी रात्रंदिनी शृंखला पायातल्या तुटतील कधितरी गंजुनी..
कोरडा असतो किनारा लाट फुटते मत्त तरिही जखम होते खोलवर पण रक्त आता येत नाही
गहिरे..
  • Log in or register to post comments

मस्त!

तुर्रमखान
Wed, 04/14/2021 - 00:58 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा