पुनवेचं चांदणं उतरलं अंगणी
अंधार गेला शुभ्र रंगात न्हाऊनी
हरवून गेलं झाडांचं हिरवं रूप
पाखरांच्या डोळ्यात भरली झोप
गगनाच्या भूमीत तारे पेरले
रातराणीचे हृदय हळूच फुलले
वाऱ्याचे पाऊल देई चाहूल
उजळले रानात काजव्याचे फूल
नभात साऱ्या मोहरला चंद्रप्रकाश
धरती सजली काळोखाचे तोडून पाश
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2253
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर कविता! आवडली.
सुंदर कविता! आवडली.
धन्यवाद
In reply to सुंदर कविता! आवडली. by श्रीगुरुजी
धन्यवाद
वाह..
वाह..
रातराणीचे हृदय हळूच फुलले
वाऱ्याचे पाऊल देई चाहूल
उजळले रानात काजव्याचे फूल
नभात साऱ्या मोहरला चंद्रप्रकाश