रूटीनाचे गंजलेले
यंत्र अखंड घुमते
जुन्या व्रणावर रोज
नवी जखम करते
अनावर भोवंडून
शिणलेल्या प्राणासाठी
वाटेवरच्या झाडाची
साथ वाटे मला मोठी
त्याचा मायाळू विस्तार
घाले हिरवी फुंकर
एक रंगीत पाखरू
झुले उंच फांदीवर
इवल्याश्या कंठातून
काढी तरल लकेरी
हाक आभाळाची येता
झेपावते दिगंतरी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3094
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला...
त्याचा मायाळू विस्तार
नित्यक्रम
In reply to त्याचा मायाळू विस्तार by Bhakti
पहिल्या दोन ओळीतच अडकलो होतो
सोडवतो माऊली ..
In reply to पहिल्या दोन ओळीतच अडकलो होतो by ज्ञानोबाचे पैजार
माऊली, "हाक निसर्गाची येता"
In reply to पहिल्या दोन ओळीतच अडकलो होतो by ज्ञानोबाचे पैजार
"टका"टक
In reply to माऊली, "हाक निसर्गाची येता" by टवाळ कार्टा