धोंडोपंतांच्या छंदशास्त्रावरील स्तुत्य उपक्रमात माझ्या वतीने ही छोटीशी समिधा समस्त मिसळपावकरी आणि कविवर्य धोंडोपंत यांना सादर अर्पण.
देवद्वार, पादाकुलक, अनुष्टुभ, गायत्री, जगती, बृहत असे अनेक छंद आज परिचयाचे आहेत. अनेक श्लोक, स्तोत्रे, वेदांमधील ऋचा, काव्ये, सर्वपरिचित सुभाषिते इ. छंदबद्ध असतातच; फक्त ती गाताना आपल्याला ती अमुक एका छंदात आहेत, याची जाणीव तेव्हढी होत नाही. मात्र छंदशास्त्राच्या माध्यमातून जेव्हा आपण छंदांची लक्षणे अभ्यासू लागतो नि परिचित उदाहरणे वाचून ती या लक्षणांशी किती जवळीक साधतात, हे पाहू लागतो, तेव्हा हे विविध छंद अधिक जवळचे वाटू लागतात. या भागात अनुष्टुभ छंदाची थोडक्यात ओळख करून घेऊ.
मागील भागात पाहिलेला पादाकुलक (अष्टाक्षरी) छंद हा अनुष्टुभाची पहिली पायरी. म्हणजेच अनुष्टुभाच्या चरणांमधील प्रत्येक ओळीत आठ अक्षरे हवीतच. त्याबरोबरच अनुष्टुभ छंद पुढील लक्षणांनी अधिक घट्ट विणला गेला आहे -
१. प्रत्येक ओळीतले पाचवे अक्षर लघु (र्हस्व) हवे.
२. प्रत्येक ओळीतील सहावे अक्षर गुरू (दीर्घ) हवे.
३. सातवे अक्षर दुसर्या आणि चौथ्या ओळीत लघु (र्हस्व) नि बाकीच्या ओळींत (पहिल्या नि तिसर्या) गुरू (दीर्घ) हवे.
अर्थात मराठीपेक्षा संस्कृतात हा छंद अधिक बांधीव आहे; मराठीत अनेकदा तो काहीसा सैल विणीत दिसतो. असो. या छंदाचे समर्पक लक्षण पुढील श्लोकातून सांगितले आहे -
श्लोके षष्ठं गुरुज्ञेयम्। सहावे अक्षर गुरू
सर्वत्र लघुपञ्चमम्। पाचवे अक्षर सर्वत्र लघु
द्विश्चतुष्पादयोः ह्रस्वम्।
सप्तमं दीर्घमन्ययोः। दुसर्या नि चौथ्या ओळीत सातवे अक्षर र्हस्व नि अन्यत्र (पहिल्या व तिसर्या ओळीत) दीर्घ
अनुष्टुभाची सर्वपरिचित उदाहरणे म्हणजे सार्थ श्रीरामरक्षा आणि मारुती स्तोत्र.
चरितम् रघुनाथस्य
शतकोटिप्रविस्तरम्
एकैकमक्षरम् पूसाम्
महापातकनाशनम्
स्मरणशक्तीवर आणखी थोडा जोर दिल्यास रामरक्षेच्या सुरुवातीलाच हा अनुष्टुभ छंद आहे, हे सांगितल्याचे आठवेल. आठवा पाहू - '.. अनुष्टुभ छंदः सीता शक्ति: श्रीमद् हनुमानकीलकम् ...' :)
मात्र संपूर्ण रामरक्षा अनुष्टुभात आहे का, याबद्दल मी स्वतः साशंक आहे; कारण रामरक्षेतील काही श्लोक शुद्ध शार्दूलविक्रीडितात आहेत. जसे -
रामान्नास्ति परायणम् परतरम् रामस्य दासोस्म्यहम्
रामेणाभिहिता निशाचरचमू भो राम मामुद्धर
याबाबत कुणास अधिक माहिती असल्यास जरूर द्यावी व चर्चा करावी.
या छंदात पद्यलेखनासाठी अनेक शुभेच्छा. त्यायोगाने चर्चा झडत राहीलच व माहितीचे आदानप्रदानही होत राहील.
शुभमस्तु!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
14704
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
पूसाम्असा नसून तो पुंसां किंवा पुंसाम् असा आहे. असो. आपला (रामभक्त हनुमान) आजानुकर्णह्यात आठ अक्षरे कुठे आहेत?
चरितम् = चरितं, महापातकनाशनम् = महापातकनाशनं असे पहा
In reply to ह्यात आठ अक्षरे कुठे आहेत? by प्रमोद देव
बरोबर!
In reply to चरितम् = चरितं, महापातकनाशनम् = महापातकनाशनं असे पहा by बेसनलाडू
चालू द्या
मागे त्या
शांत राहा
In reply to मागे त्या by खरा डॉन
हे तु कोण
In reply to शांत राहा by आजानुकर्ण
तू
In reply to हे तु कोण by खरा डॉन
ह्यातच सगळ
In reply to तू by आजानुकर्ण
मराठी उदाहरणे द्याल का?
सहमत
In reply to मराठी उदाहरणे द्याल का? by ऋषिकेश
अनुष्टुप छंदाची चाल
In reply to सहमत by घाटावरचे भट
माहिती बद्दल धन्यवाद
मराठी उदाहरण
बेला
लै अवघड छंद
In reply to बेला by सहज
लघु गुरू कसे ओळखावेत?
In reply to लै अवघड छंद by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभारी !!!
In reply to लघु गुरू कसे ओळखावेत? by बेसनलाडू
वृत्त आणि
एक मराठी उदाहरण व एक संस्कृत उदाहरण
१.
शंका
यमक जुळणी माफ :)
In reply to शंका by ऋषिकेश