आव नको की ठाव नको
जड टोपण नाव नको
सरड्या सारखे असुदे जीवन
कुंपणापर्यंतही धाव नको
उगीच तुम्ही मोठे व्हा
मोठे होणे जपत रहा
पडला का कुठे डाग
नीट ते शोधून पहा
पाषाणातून देव नको
टाकीचे मग घाव नको
चार चौघात फिरताना
मिळणारा तो भाव नको
मंदिराचा कळस मोठा
देवा सारखा मान खरा
नको अलिप्त मोठेपणा
मी पायरीचा दगड बरा
नको रेशमी वस्त्र भरजरी
समारंभात घालायला
असुदे मी रूमाल सुती
जखमेवरती बांधायला
का अथांग सागर व्हावे
खारटपणाचे दोष घ्यावे
होऊन मी इवलासा झरा
तहानलेल्यास घोट द्यावे
कशास मग ते मोठे व्हावे?
आतून आतून रिक्त रहावे
भले वाटते छोटे व्हावे
गरजे साठी धावूनी यावे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6996
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख!!
सुरेख!!
सुंदरच...
मस्त लिहिलेय. आवडले.
सं - दी - प
+१
In reply to सुंदरच... by चांदणे संदीप
+१
अगागा...
जबरदस्त द्वैअर्थी कविता,
जितके सोज्वळ शब्द आहेत तेवढीच चावटही आहे. (अर्थात कोणता अर्थ घेउन वेंजॉय करायची हे वाचकाच्या दृष्टीकोनावर अवलंबुन आहे)
जिओ लैच आवडल्या गेली आहे.
पैजारबुवा,
=)) अगदी अगदी.
In reply to अगागा... by ज्ञानोबाचे पैजार
=))
अगदी अगदी.
+१
In reply to =)) अगदी अगदी. by प्रचेतस
कविता सुंदर आहेच शंकाच नाही
का अथांग सागर व्हावे
खारटपणाचे दोष घ्यावे
होऊन मी इवलासा झरा
तहानलेल्यास घोट द्यावे
>>> =))))
धन्यवाद ज्ञानोबाचे पैजार!
In reply to अगागा... by ज्ञानोबाचे पैजार
आपल्या प्रतिक्रिये मुळे आणखी लिखाण करण्यास प्रेरणा मिळेल. धन्यवाद !
छान...!
आवडली कविता.
-दिलीप बिरुटे
मस्त आवड्ली.
मस्त आवड्ली.
+१
+१
छान कविता !
छान कविता !
महापुरे झाडे जाती...
जिव्हाळा जपणारी लव्हाळी कविता... मस्तच.
छान!
छान! लिहीत रहा.
आवडली कविता.
आवडली कविता.
सुंदर अर्थपूर्ण कविता !!!
सुंदर अर्थपूर्ण कविता !!!
धन्यवाद !
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद
आवडली कविता! लिहित रहा!
आवडली कविता! लिहित रहा!
सुरेख!
सुरेख!