आव नको की ठाव नको
जड टोपण नाव नको
सरड्या सारखे असुदे जीवन
कुंपणापर्यंतही धाव नको
उगीच तुम्ही मोठे व्हा
मोठे होणे जपत रहा
पडला का कुठे डाग
नीट ते शोधून पहा
पाषाणातून देव नको
टाकीचे मग घाव नको
चार चौघात फिरताना
मिळणारा तो भाव नको
मंदिराचा कळस मोठा
देवा सारखा मान खरा
नको अलिप्त मोठेपणा
मी पायरीचा दगड बरा
नको रेशमी वस्त्र भरजरी
समारंभात घालायला
असुदे मी रूमाल सुती
जखमेवरती बांधायला
का अथांग सागर व्हावे
खारटपणाचे दोष घ्यावे
होऊन मी इवलासा झरा
तहानलेल्यास घोट द्यावे
कशास मग ते मोठे व्हावे?
आतून आतून रिक्त रहावे
भले वाटते छोटे व्हावे
गरजे साठी धावूनी यावे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6939
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख!!
सुंदरच...
+१
In reply to सुंदरच... by चांदणे संदीप
अगागा...
=)) अगदी अगदी.
In reply to अगागा... by ज्ञानोबाचे पैजार
+१
In reply to =)) अगदी अगदी. by प्रचेतस
धन्यवाद ज्ञानोबाचे पैजार!
In reply to अगागा... by ज्ञानोबाचे पैजार
छान...!
मस्त आवड्ली.
+१
छान कविता !
महापुरे झाडे जाती...
छान!
आवडली कविता.
सुंदर अर्थपूर्ण कविता !!!
धन्यवाद !
आवडली कविता! लिहित रहा!
सुरेख!