Skip to main content

मौनाइतके कुणीच नाही

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 08/11/2019 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
अथांग, उत्कट, उधाणले तरि किनार ओढुन जसा समिंदर.. स्थितप्रज्ञ कधि सळसळणारे जळाकाठचे वा औदुंबर.. प्रेमळ, नाजुक, पोक्त, समंजस प्राजक्तासम हळवे लोभस.. काजळ रेखुन कधि भिडणारे खट्याळ हट्टी अवखळ ओजस.. कितीहि काही आत उकळले संतापाला घट्ट आवरे.‌ शालिन कधि तर भळभळणारे मिटल्या ओठी दु:ख गोजिरे.. ....... असे देखणे, असे बोलके मौनाइतके कुणीच नाही.... कुणीच नाही.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 6842
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

अतिशय सुरेख रचना..

सुंदर कविता .आवडली

असे देखणे, असे बोलके मौनाइतके कुणीच नाही हे विषेश आवडले आणि पटले सुध्दा पैजारबुवा,

आहे, ना बोले तुम या गाण्याच्या जातकुळीतले. मौन राखण्यात सतत अपयशी मिपाकर नाखु

पद्यात मला गती नाही पण ह्या रचनेमागचा भाव एकदम भावला! - (मौनात राहायला आवडणारा) सोकाजी

ही कल्पना अन् कविता दोन्ही आवडली.

आजूबाजूला इतकं happening राजकारण चालू असताना देखील , ही कविता वाचणा-या आणि मौनाच्या कवितेवर प्रतिसाद देणा-या सगळ्यांना धन्यवाद!

मौनाची कविता आवडली. छान. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे (अजिबात मौनात न राहणारा समिंदर )

शेवटच्या २ ओळी वाचल्यावर वरील ओळींचा अर्थ समजला... [मौनी मदनबाबा बाणवाले ] :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Imagine Dragons – Believer (8D AUDIO) [ Use Headphones To Feel The Experience ]