स्थलकालाचे ताणेबाणे
जटिल, चिवट पण तटतट तुटले
घालित अवघड नवे उखाणे
जडातुनी चैतन्य उमलले
सप्तरंग लवथवले, मिटले
सप्तसूर झंकारुन शमले
भवतालाला भारून काही
पुन्हा निवांत झाले
तर्काच्या सीमेवर तेव्हा
अतर्क्य भेटुनी गेले
छान!
तर्कबुद्धीच्या पलिकडे असलेला, एक नवाच रोमांचकारी अनुभव, अवचित येण्याच्या क्षणाचे वर्णन खूप आवडले. :-)
दुसरी कविताही त्याचेच वर्णन सांगतेय, होय ना?
सुंदर आणि अफाट आहे हे!
विस्कटून सांगताल का भाऊ ?
छान!
राघव,