मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रार्थना!

मनमेघ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
देव भेटो वा न भेटो येऊ दे हे मागता आतला माणूस माझ्या नित्य राहो जागता । चाललो कुठल्या दिशेला हे न उमगे ज्या क्षणी एक ही साधी कसोटी आठवो त्या त्या क्षणी दुःख दुसऱ्या देउनी सुख येत नाही भोगता ।। हासता यावे मला पाहून इतरांना सुखी भावना माझी नसो सहवेदनेला पारखी या विचारांना कृतीही येऊ दे मज जोडता ।। कोण मी? हा प्रश्न राहो सारखा माझ्या मनी काय नाते या जगाशी? हे असावे चिंतनी आरसा बघतो तसे जग येऊ दे मज पाहता ।। ~ मनमेघ

वाचने 3994 वाचनखूण प्रतिक्रिया 9

राघव 07/05/2019 - 21:01
वाह! खूप खूप दिवसांनी एकदम अंतर्मुख करणारी कविता वाचायला मिळाली!! बंधो, "आतला माणूस माझ्या नित्य राहो जागता " ही ओळच सगळं व्यापून आहे. __/\__

शिव कन्या 08/05/2019 - 01:09
आतला माणूस माझ्या नित्य राहो जागता .... सुंदर. आवडली.

मनमेघ 08/05/2019 - 07:30
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.