|| गणेश पूजा ||
लेखनविषय:
आज अंगारकी चतुर्थी निमित्त गणेशाची पूजा करू ..
|| गणेश पूजा ||
चला करू गणेशाचे आज पूजन
नवविधा भक्तीने आपण करू त्याचे अर्चन || धृ.||
दहा इंद्रियांनी करू मानस पूजा
नसे तुजवीण भाव दुजा ||१ ||
दुग्ध घृत मधु दही शर्करा स्नाने
अभिषेक करतो मी मनोभावाने ||२ ||
दुर्वा जास्वदीं फुले अर्पूनि चरणी
आरती करूया धूप दीप लावूनी ||३ ||
निनादति मंगल वाद्ये ताल मृदूंग वीणा वाजे
वैभव नमितो गणेशा रूप सुंदर साजे ||४ ||
वाचने
1954
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
दहा इंद्रियांनी करू मानस पूजाआम्हाला पाच आणि उरलेलं गट फीलींग धरलं तर सहा. दहा कसे काय व्बॉ?
In reply to दहा इंद्रियांनी करू मानस पूजा by सूड
दहा तर दहा तुला काय फरक पडतो रे? त्या पेक्षा भावना बघ त्या जास्त महत्वाच्या...
आरती प्रचंड आवडली आहे
पैजारबुवा,
In reply to गप की रे... by ज्ञानोबाचे पैजार
जोडीनं पूजा केली की धा होणार नाहीत का? शिंपल...
In reply to जोडीनं पूजा केली की धा होणार by खेडूत
पॉइंट आहे
पैजारबुवा,
In reply to जोडीनं पूजा केली की धा होणार by खेडूत
ha ha ha ..!!
In reply to जोडीनं पूजा केली की धा होणार by खेडूत
जोडीनं पूजा केली की धा होणार नाहीत का?दूर्दृष्टी!!
In reply to दहा इंद्रियांनी करू मानस पूजा by सूड
वापर करून करतात ती ऐंद्रिय पूजा असते- मानस पूजा नव्हे. मग (दहा अथवा कमी-जास्त) इंद्रियांनी मानस पूजा कशी करता येईल ही शंका येत आहे. की मन हे एक इंद्रियच गृहित धरले आहे? कवी / तज्ञांनी मार्गदर्शन करावे.
In reply to इंद्रियांचा by अनन्त्_यात्री
वेळेला केळ आणि उपासाला सिताफळ अशी एक म्हण आहे.
तदनुसार कधी कधी इंद्रीयांची मानसपूजा करायची वेळ येउ शकते माणसावर
पैजारबुवा,
In reply to भावना समजून घ्या..त्या महत्वाच्या.. शब्द इकडचे तिकडे होउ शकतात.. by ज्ञानोबाचे पैजार
=))
In reply to भावना समजून घ्या..त्या महत्वाच्या.. शब्द इकडचे तिकडे होउ शकतात.. by ज्ञानोबाचे पैजार
||आपल्या मर्मग्राही मार्गदर्शनामुळे अभूतपूर्व अंतर्दृष्टी मिळाली. शब्दांचे वैयर्थ्य व संकल्पनांमधील परस्परसंबंधांची यथार्थ कल्पना आली||
||धन्यवाद ||
:)
In reply to भावना समजून घ्या..त्या महत्वाच्या.. शब्द इकडचे तिकडे होउ शकतात.. by ज्ञानोबाचे पैजार
तदनुसार कधी कधी इंद्रीयांची मानसपूजा करायची वेळ येउ शकते माणसावरत्या मानसपूजेवरही एखादी फक्क्ड कविता येउदेत. ईक्षुदंडांसह!! ;)
In reply to तदनुसार कधी कधी इंद्रीयांची by सूड
टायटल तर ठरले. आता फक्कड कवितेचे शिवधनुष्य उचलण्याची व त्यास प्रत्यंचा लावण्याची नम्र विनंती मिपाविडम्बनशिरोमणींना करण्यात येत आहे. फार कळ सोसायला लावू नये.
दहा इंद्रियांनी करू मानस पूजा