शांत मनोहर अंगणामध्ये
वेल पहुडली बाई
अवखळ वारा अंगावरुनी
लहरत, लहरत जाई
सळसळला मग देह वेलीचा
लटक्याने ती कापत राही
हळुवार फुलांचा गंध चोरुनी
वारा अलगद पसार होई
गंधचोरट्या वारया तुजला
कांय म्हणू मी आता .. ?
स्पर्शाने सळसळल्या सार्.या
अंगावरती लाटा
नियंत्याला जाऊनी सांगीन
समीरण झाला वेडा
थांबव त्याचा वारु वेंधळा
पायात अडकवूनी खोडा
तुच मला ग केले, जाई
अवखळ आणि गंधविभोर
रागाने कां म्हणशी आता
प्रांगणातला अल्लड चोर ?
उमलत्या कळ्यांच्या वाटेवर मी
चित्तचोरटा होऊनी येतो
हवे हवे ते देऊनी त्यांना
गंध फुलांचा घेऊनी जातो
( मग मी चोर कसा गं होतो ? )
नाते आपले निसर्गनिर्मित
साजणी तुला माहीत
सोडूनी वेडे हा राग मनीचा
घे मजसी तू कवेत.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2176
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली
अतिशय सुरेख..
गंधविभोर
फार छान
गंधविभोर
वा! सुंदर
कवितेतील काही शब्द लिहीताना आलेल्या अडचणी