ताणे-बाणे स्थल-कालाचे..
लेखनविषय:
काव्यरस
अथांग धूसर भविष्य उडवी
तुषार अविरत अधुनाचे(*)
क्षणजीवी वर्तमान घडवी
स्फटिक अहर्निश अतिताचे (**)
उत्पत्ती अन स्थिती,लयाचे
रहाट अविरत चालतसे
स्थूल, सूक्ष्म, चेतन नि जडाचे
पोहोरे माळुनी फिरत असे
ताणे-बाणे स्थल-कालाचे
तोलुनी धरिती विश्वाला
जटिल,चतुर्मित रूप तयांचे
गोचर केवळ गणिताला
===============================
(*) अधुनाचे = वर्तमान कालाचे
(**) अतिताचे = भूत काळाचे
वाचने
1671
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
वाह!!