Skip to main content

" तू "

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी मंगळवार, 23/05/2017 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
येताच तू, किनारा शब्दात व्यक्त होतो बेभान लाट होते वारा अनर्थ करतो पदरावरी तुझ्या ग फुलती फुले अनेक संध्येस धुंदी येते गंधात स्पर्श फिरतो डोळ्यातले तुझे ते निः शब्द भाव भोळे उर्मीत भावनांच्या ओठात शब्द घसरे चढतो असाच कैफ जाणीव भ्रष्ट होते लहरीत भावनांच्या मजसी भुरळ पडते तो काळही थबकतो अंधार पेट घेतो लाजूनी सागरही ओहोटीत मंद हसतो.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1335
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

डोळ्यातले तुझे ते निः शब्द भाव भोळे उर्मीत भावनांच्या ओठात शब्द घसरे
अहाहा...! जियो. -दिलीप बिरुटे