लँग्स्टन ह्यु या अमेरिकन कवीची ही एक कविता फार आवडली, तिचा अनुवाद करण्याचा प्रयत्न.
पंखांसारखे हात पसरून
स्वच्छ उन्हात नाहत
स्वत:भोवती गिरक्या घेत रहावं, नाचावं
सूर्य मावळेस्तोवर..
आणि मग खुशाल पहुडावं गार वारं अंगावर घेत
उंच, डेरेदार वृक्षाच्या छायेत संध्याकाळी
आणि रात्र अलगद उतरावी
काळीसावळी, माझ्यासारखी.
असं माझं स्वप्न आहे..
पंखांसारखे हात पसरून
टळटळीत उष्ण दुपारी
नाचावं! गिरक्या घ्याव्या! झपुर्झा व्हावं!
आणि दिवस चटकन सरावा
उदास संध्याकाळी पाठ टेकावी
उंच, किरकोळ झाडाजवळ
रात्र तशीच यावी अलगद
काळीशार. माझ्यासारखीच..
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2432
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
मूळ कविताही दिलीत तर उत्तम.
मूळ कविताही दिलीत तर उत्तम.
लिंक वर दिलेली आहे, मूळ कविता अशी..
In reply to मूळ कविताही दिलीत तर उत्तम. by यशोधरा
To fling my arms wide
In some place of the sun,
To whirl and to dance
Till the white day is done.
Then rest at cool evening
Beneath a tall tree
While night comes on gently,
Dark like me—
That is my dream!
To fling my arms wide
In the face of the sun,
Dance! Whirl! Whirl!
Till the quick day is done.
Rest at pale evening . . .
A tall, slim tree . . .
Night coming tenderly
Black like me.
ओह, लक्षात नाही आली लिंक
In reply to लिंक वर दिलेली आहे, मूळ कविता अशी.. by शिवोऽहम्
ओह, लक्षात नाही आली लिंक दिलेली. कविता पेस्टल्याबद्दल आभार.
कविता तर सुरेख आहेच, भावानुवादही आवडला.
मूळ कविता आणि अनुवाद दोन्ही
मूळ कविता आणि अनुवाद दोन्ही सुंदर ! 'झपुर्झा व्हावं' हे फार आवडलं !
वाह! मूळ कविता आणि भावानुवाद,
वाह! मूळ कविता आणि भावानुवाद, दोन्ही फार तरल आणि मनात रुंजी घालणारे.
वा!
सुरेख भावानुवाद!
वाह् ..
सुरेख भावानुवाद!
अभिनंदन! पुलेशु!
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
आवडलं.
आवडलं.
बाकी हे झपुर्झा मंजे काय ?
बाकी हे झपुर्झा मंजे काय ?
बरेच दिवस मनात सवाल हाय!
असा पुर्ण मोकळा लक्ष्मी रोड
In reply to बाकी हे झपुर्झा मंजे काय ? by अत्रुप्त आत्मा
असा पुर्ण मोकळा लक्ष्मी रोड आहे, तुलशिबाग पूर्ण सुनी आहे. पोटात दूर्वांकुराचा अनलिमिटेड आमरस आहे. त्यानतर लावलेला मस्त बार किक देतोय. एक्टिव्हावर मांडी घालून त्या रसत्यावरुन मोकाट फिरताना तुमच मन म्हनेल. " ओ बुवा मि झपुरझा झालो"
तुम्ही म्हणाल " लुलुलुलुलुलुलुलुलु "
केशवसूत म्हणतात
In reply to बाकी हे झपुर्झा मंजे काय ? by अत्रुप्त आत्मा
हर्षखेद ते मावळले,
हास्य निवालें
अश्रु पळाले;
कण्टकशल्यें बोंथटलीं,
मखमालीची लव वठली;
कांही न दिसे दृष्टीला,
प्रकाश गेला,
तिमिर हरपला;
काय म्हणावें या स्थितिला ?-
झपूर्झा ! गडे झपूर्झा !
हर्षशोक हे ज्यां सगळें,
त्यां काय कळे ?
त्यां काय वळे ?
हंसतिल जरि ते आम्हांला,
भय न धरुं हें वदण्याला :-
व्यर्थीं अधिकची अर्थ वसे,
तो त्यांस दिसे,
ज्यां म्हणति पिसे,
त्या अर्थाचे बोल कसे?-
झपूर्झा ! गडे झपूर्झा !
**केशवसुत
In reply to केशवसूत म्हणतात by शिवोऽहम्
**केशवसुत
सुरेख.
सुरेख.
वा!
वा!
मूळ कविता आणि भावानुवाद दोन्हीही सुरेख!