मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वप्नांचे कवडसे

शिवोऽहम् · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
लँग्स्टन ह्यु या अमेरिकन कवीची ही एक कविता फार आवडली, तिचा अनुवाद करण्याचा प्रयत्न. प‌ंखांसार‌खे हात‌ प‌स‌रून‌ स्व‌च्छ‌ उन्हात‌ नाह‌त‌ स्व‌त:भोव‌ती गिर‌क्या घेत‌ र‌हाव‌ं, नाचाव‌ं सूर्य‌ माव‌ळेस्तोव‌र‌.. आणि म‌ग‌ खुशाल‌ प‌हुडाव‌ं गार‌ वार‌ं अंगाव‌र‌ घेत‌ उंच, डेरेदार‌ वृक्षाच्या छायेत‌ स‌ंध्याकाळी आणि रात्र‌ अल‌ग‌द‌ उत‌रावी काळीसाव‌ळी, माझ्यासार‌खी. अस‌ं माझ‌ं स्व‌प्न‌ आहे.. प‌ंखांसार‌खे हात‌ प‌स‌रून‌ ट‌ळ‌ट‌ळीत‌ उष्ण दुपारी नाचाव‌ं! गिर‌क्या घ्याव्या! झ‌पुर्झा व्हाव‌ं! आणि दिव‌स‌ च‌ट‌क‌न स‌रावा उदास‌ स‌ंध्याकाळी पाठ‌ टेकावी उंच‌, किर‌कोळ‌ झाडाज‌व‌ळ‌ रात्र‌ त‌शीच यावी अल‌ग‌द‌ काळीशार‌. माझ्यासार‌खीच..

वाचने 2379 वाचनखूण प्रतिक्रिया 15

In reply to by यशोधरा

शिवोऽहम् Sat, 04/29/2017 - 05:42
To fling my arms wide In some place of the sun, To whirl and to dance Till the white day is done. Then rest at cool evening Beneath a tall tree While night comes on gently, Dark like me— That is my dream! To fling my arms wide In the face of the sun, Dance! Whirl! Whirl! Till the quick day is done. Rest at pale evening . . . A tall, slim tree . . . Night coming tenderly Black like me.

In reply to by शिवोऽहम्

यशोधरा Sat, 04/29/2017 - 06:35
ओह, लक्षात नाही आली लिंक दिलेली. कविता पेस्टल्याबद्दल आभार. कविता तर सुरेख आहेच, भावानुवादही आवडला.

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. Mon, 05/01/2017 - 22:06
असा पुर्ण मोकळा लक्ष्मी रोड आहे, तुलशिबाग पूर्ण सुनी आहे. पोटात दूर्वांकुराचा अनलिमिटेड आमरस आहे. त्यानतर लावलेला मस्त बार किक देतोय. एक्टिव्हावर मांडी घालून त्या रसत्यावरुन मोकाट फिरताना तुमच मन म्हनेल. " ओ बुवा मि झपुरझा झालो" तुम्ही म्हणाल " लुलुलुलुलुलुलुलुलु "

In reply to by अत्रुप्त आत्मा

शिवोऽहम् Tue, 05/02/2017 - 00:13
हर्षखेद ते मावळले, हास्य निवालें अश्रु पळाले; कण्टकशल्यें बोंथटलीं, मखमालीची लव वठली; कांही न दिसे दृष्टीला, प्रकाश गेला, तिमिर हरपला; काय म्हणावें या स्थितिला ?- झपूर्झा ! गडे झपूर्झा ! हर्षशोक हे ज्यां सगळें, त्यां काय कळे ? त्यां काय वळे ? हंसतिल जरि ते आम्हांला, भय न धरुं हें वदण्याला :- व्यर्थीं अधिकची अर्थ वसे, तो त्यांस दिसे, ज्यां म्हणति पिसे, त्या अर्थाचे बोल कसे?- झपूर्झा ! गडे झपूर्झा !

रुपी Mon, 05/01/2017 - 23:05
वा! मूळ कविता आणि भावानुवाद दोन्हीही सुरेख!