मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जाणीव

मनीषा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कुठेतरी दुःख माझं कण्हत राहतं अश्र्रुंना वाट देत राहतं आयुष्य संपलेलं कणाकणांनी जाणीवेच्या टोकांनी बोचत राहतं नाही कधी केला विचार अधिकाचा जे सामोरं आलं तेच माझं होतं एकेक धागा उकलून आयुष्याची वीण उसवलेली आणि सांधण्यासाठी सुईचं टोक मोडलेलं असतं नजरांचे ते असंख्य वार अन बोचर्‍या शब्दांचे आघात सहन करून, भावनांचं तळं गोठत राहतं कशाची तक्रार? चिंता ही कसली? दुसरं टोक आयुष्याचं आपणहून जवळ येत जातं यातनांनी मात दिली माझ्या जाणीवांना आणि मानलं मी की आभाळच माझं तितकंसं मोठं नव्हतं

वाचने 2915 वाचनखूण प्रतिक्रिया 11

मदनबाण Mon, 10/06/2008 - 10:12
यातनांनी मात दिली माझ्या जाणीवांना आणि मानलं मी की आभाळच माझं तितकंसं मोठं नव्हतं व्वा..सही.. "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

मीनल Mon, 10/06/2008 - 16:40
छान आहे कविता. दुसरं टोक आयुष्याचं आपणहून जवळ येत जातं हे तर फार सत्य आहे . मीनल.

राघव Tue, 10/07/2008 - 10:18
एकेक धागा उकलून आयुष्याची वीण उसवलेली आणि सांधण्यासाठी सुईचं टोक मोडलेलं असतं हे आवडले. मुमुक्षु

अनिल हटेला Fri, 10/10/2008 - 07:54
सारो छे !!! आवडली कविता !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..