Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संजय क्षीरसागर on Sat, 02/04/2017 - 18:50
नव गृहाचे कर्जही, फेडणे आता उभ्याने नोकरीशी जुंपणेही फिरुनी ते, नव्या दमाने । राहीले मनात गाणे, वर बॉसचे जोडे नव्याने, काय पडलो मी भरीला, बिल्डरांच्या सुक्या दमाने । कोणत्या शैय्येवरी असते मजा सांगा गड्यांनो, छळे इएमाय वेळी-अवेळी, रोजचा नव्या बळाने । भूक तगडी पण रोमान्सही, का जमेना रोज आता ? रेंटातूनी हप्ता वळविणे माथी का, पुन्हा नव्याने । तू मला कुरवाळणेही सोडले आहे अताशा, टेक-होम झाला कमी का? व्हिलनी नव्या लोनाने । भाडेकरी मी शोधतो पण, रेंट पाडूनी मागती, मुजोर कामवालीचाही रेट, वाढतो नव्या दराने । मोल उसंतीला ना उरले, बिल्डराने पुन्हा काढली , नदीकाठची स्कीम देखणी, नव्या मुहूर्ती, नव्या दराने । आभार्स !
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sat, 02/04/2017 - 19:14

Permalink

जब्बरदस्त हो संजयजी.

जब्बरदस्त हो संजयजी. आवडले एकदम.
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Sat, 02/04/2017 - 20:19

Permalink

लै भारी देवा... जबराटच !

लै भारी देवा... जबराटच !
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 02/04/2017 - 22:27

Permalink

ह्ही ही ही ही! =))

ह्ही ही ही ही! =))
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sat, 02/04/2017 - 22:50

Permalink

अर्र..... आवरा संक्षिना या,

अर्र..... आवरा संक्षिना या, छळती नव्या दमाने! =)) मस्त हो राजे! बढिया...
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Sat, 02/04/2017 - 23:22

Permalink

कं लिवलंय! कं लिवलंय!!

कं लिवलंय! कं लिवलंय!!
  • Log in or register to post comments

Submitted by लीना कनाटा on Mon, 02/06/2017 - 09:07

Permalink

सुरेख संक्षी

इएमायमुळे सुबत्ता गेली | सुबत्तेविना स्वास्थ गेले | स्वास्थविना प्रगती गेली | प्रगतीविना वित्त गेले | वित्ताविना इएमाय ग्रस्त खचले | इतके अनर्थ इएमायने केले! इति इएमाय पुराणाम संक्षीप्त
  • Log in or register to post comments

Submitted by शब्दबम्बाळ on Mon, 02/06/2017 - 10:08

Permalink

अगागा! पाणीच आणलात राव डोळ्यात! :P

राबतो दिन रात्र तरीही भार हा कमी होईना शोधतो कमवायला जोड-धंदे मी, पुन्हा नव्याने! घर छोटे कर्ज मोठे, संपेल का विवंचना, बांधले आयुष्य माझे दावणीला, भरल्या मनाने...
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 02/06/2017 - 10:54

In reply to अगागा! पाणीच आणलात राव डोळ्यात! :P by शब्दबम्बाळ

Permalink

व्वा !

मीटरमधे बहुदा असं बसेल राबतो रात्रंदिनी तरी भार कमी काय होईना, शोधितो मी जोड-धंदा फावल्यावेळी, नव्या दमाने! सुपरबिल्टप एरिया अन अप्पर लिमीटच्या लोनने, बांधले मी दावणीला मालाच की, पुन्हा नव्याने |
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Mon, 02/06/2017 - 12:31

Permalink

हा हा भारी! पण विडंबनाच्या

हा हा भारी! पण विडंबनाच्या नावात कंस नाहीत, कंसाच काय झालं? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 02/06/2017 - 12:42

In reply to हा हा भारी! पण विडंबनाच्या by रातराणी

Permalink

कंसामुळे विस्ताराच्या मर्यादा येतात

आणि विषय अमर्याद आहे म्हणून....
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Mon, 02/06/2017 - 12:46

In reply to कंसामुळे विस्ताराच्या मर्यादा येतात by संजय क्षीरसागर

Permalink

तो लॉलीपॉपचं काय झालं याचा

तो लॉलीपॉपचं काय झालं याचा बदला होता.. :) जमला नई बहुतेक. नेक्स्ट टाइम :)
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 02/06/2017 - 14:11

In reply to तो लॉलीपॉपचं काय झालं याचा by रातराणी

Permalink

ओहो !

आज लॉलीपॉपही वाटे मला, च्युईंगम कशाने ? फिरुनी येई इएमाय बघ बुलेटवाणी, पुन्हा नेमाने |
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलभाऊ on Mon, 02/06/2017 - 13:41

Permalink

मस्त लिहिलंय...

मस्त लिहिलंय... _/\_
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5243 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com