जखमात यौवनाच्या
जखमात यौवनाच्या झाले किती दिवाणे
असती कुणी विलासी कोणी उदासवाणे
असतात काळजाचे गुंते जुने-पुराणे
शून्यात जाई कोणी घेतो कुणी धीराने
लाखो तऱ्हा तयांच्या नि शेकडो ठिकाणे
बाजार काळजाचा लाखो इथे दुकाने
मदिरा कुणा सुखावी कोणास आर्त गाणे
भासे आयुष्य कोणा ती पेटली स्मशाने
ते दुःख झाकण्याला करती किती बहाणे
ओठात गोड हासु कोणा नटाप्रमाणे
ती आग अंतरीची जाळी कणाकणाने
ना सांगता कुणा ये हे मोकळेपणाने
होती अबोल का हो? ना बोलती कशाने
हळुवार त्या स्मृतींना कि त्यागती अशाने?
मजनू इथे फिरस्ते तुडवित माळराने
आयुष्य कंठती अन् घायाळ काळजाने
जखमात यौवनाच्या होती कुणी शहाणे
बदलुन पायवाटा तरती अनुभवाने
सुरुवात जीवनाची करती कुणी नव्याने
उजळुन जन्म सारा पुन्हा नव्या दिव्याने
- शार्दुल हातोळकर
वा. कविता आवडली.
अरे वा... मस्तच लिहिली आहे.
अ प्र ति म! त्रिवार सलाम.
वा!
सुन्दर
सुरेख..
आवडली
अप्रतिम !
जबरदस्त!
सर्वांचे हार्दिक आभार !!
आवडली
क्या बात!
धन्यवाद !!
++1
प्रतिभाशाली कविता!
धन्यवाद समाधान आणि देशप्रेमी!!
सुरेख...
खूप छान.. सुंदर शब्द..
भावली... ओळी आठवल्या... कवी