Skip to main content

अरे पाचशे हजार

लेखक मधुका यांनी बुधवार, 30/11/2016 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
(बहिणाबाईंची माफी मागून) अरे पाचशे हजार, जसा खिशावर भार आधी रांगेचे चटके, तेव्हा मिळती शंभर अरे पाचशे हजार, बंद झाला, खोटा नाही, भरा स्वतःच्या खात्यात, काम सोपे, तोटा नाही! अरे पाचशे हजार, नको रडनं कुढनं, येड्या, जरा सोस कळ, फायदा तुझा रांगेनं अरे पाचशे हजार, कर देशाचा विचार देई रोखीला नकार, ई-पैशा तिथे होकार!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4558
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

मोदींना, किंवा गेलाबाजार फडणवीसांना पाठवा कविता. एखाद्या कॅम्पेनला वापरली जाण्याचे पोटेन्शिअल आहे कवितेत. ;-)

छान!