Skip to main content

आत्मक्लेश४

लेखक नंदकिशोर साळ्वे यांनी बुधवार, 24/09/2008 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
निवार्‍यासाठी पावसानं माझंच घर शोधलं, मग स्वागतासाठी त्याच्या मी अंथरलं पातेलं. डोळे पुसण्यास माझे पाऊस धावूनी आला, थेंब कोणता तुझा नि माझा हेच कळेना म्हणाला. ढगाच्या सावलीला डोंगर समजला डाग, पेटून उठला वणवा जेव्हां ढग म्हणाला फुलतेय बाग.
लेखनविषय:

वाचने 3290
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

कल्पनाशक्ती. विरोधाभास आवडले.

तीनही चारोळ्या मस्त ! मग स्वागतासाठी त्याच्या मी अंथरलं पातेलं. हे तर जबरदस्त ! --लिखाळ.

आवडल्या !!! जबरदस्त कल्पना.

मस्त

आवडल्या डोळे पुसण्यास माझे पाऊस धावूनी आला, थेंब कोणता तुझा नि माझा हेच कळेना म्हणाला. ......सुंदर

छान! (आस्वादक)बेसनलाडू