Skip to main content

आखाजीचा सण

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 09/05/2016 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
गवराईचा सन आला गवराईचा सन आला या ग सयांनो पुजू तिला या ग सयांनो पुजू तिला सयांनो ग सयांनो या या तुम्ही सार्‍या या झोका झाडाला टांगला त्याला तुम्ही झोका द्या आता आला आला वारा झोक्याला तो झुलवितो आखाजीच्या सनाला ग माहेराला सुखवीतो माहेराच्या आंगणात आंबा पहा मोहरला पानोपानी त्याच्या आता कैर्‍या लगडल्या कैरी हाले कैरी डुले वार्‍यासंगे मागेपुढे हेलकाव्याने कैरी तुटे तुटूनीया खाली पडे मायबापभावाच्या डोळ्याला ग पानी सुटे नको माय तू ग रडू तुझ्या ग कैरीपाई कैरी आता तुझी नाही कैरी आता तुझी नाही - पाभे
काव्यरस

वाचने 2861
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

आवडली, वसंतात झाडांना झोके बांधून मनसोक्त झुलणार्‍या (माहेरी आलेल्या) मुली डोळ्यासमोर आल्या.

कविता आवडली .. खुप दिवसानी इकडे ? एक शंका : गौराई च्या सनात कैरी नसेल बहुतेक झाडाला असे वाटते ..