माय
माही माय माही माय नाई शिकली लेयनं
रातं दिसं मेहनतं
जीवं मातीले जायनं
चुरुक भुरुक अशी
लावे झाकटीतं रई
देते पाह्यटीचं मले
खायाले सायी चं दई
ठूनं हातावरं डोक्सं
तिचं वगारु पाजनं
शाळेतल्या पोराईचं
यकं दोनं आईकनं
चुनं भाकरं थापूनं
घाई घाई वावरातं
कापूस येचता येचता
जोळे नख्ख्याईशी नातं
सोसून सासरवासं
तरी राये समाधानी
पोरं शिकतीलं लयं
सदा राये ह्याचं ध्यानी
दुध तपवूनं राती
टाके त्यातं इरजनं
व्हते दई,लोनी चं ते
नाई नासलं आजुनं
एक दोन ठिकाणी 'लय' फिस्काटलीय
मदर्स डे च्या निमित्ताने
खिक्क!
सुरेख. आवडली हो कविता उध्दवभौ
धन्यवाद !
अप्रतिम! काय गोडवा आहे या
कविता अप्रतिम .. पुन्हा
कविता आवडली.