कसे पारिजातास सांगू सख्यांनो जरा आवरी रे गंधा तुझ्या
सखी मोगरीही धुंदावली बघ विसरून अस्तित्वगंधा तिच्या
नको देखणे ते सडे सोनपुष्पी, नसे रातराणी ध्यानीमनी
प्राजक्त दारी ओघळावा, दरवळ रुजावा मुग्ध मातीतुनी
फुलावे किती सडे मौक्तिकांचे जणू प्रित तुजवर मोगरीची जडे
कधी सांडती आंसवे दोन, पाठी कधी थाप ती कौतुकाची पडे
इथे आज शब्दांत घडे आगळे शिल्प सुखे मोहरे ताज स्वप्नांतला
नसे शाश्वती श्वास कुठवर टिकावा? फुले नित्य प्राजक्त दारातला .
विशाल कुलकर्णी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2672
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहा!
मससस्त!
या
कसचं कसचं नाखुकाका ;)
In reply to या by नाखु
वाह्ह...
सही विशाल दा
अप्रतिम!!
ब-याच दिवसांनी विकुंची कविता आलेली आहे
नको देखणे ते सडे सोनपुष्पी,
सुंदर.........
_/!\_
In reply to सुंदर......... by निशदे
धन्यवाद मंडळी.
अतिशय
सुगंधी कविता आवडली.