Skip to main content

वाट दाट वणव्याची

लेखक रातराणी यांनी गुरुवार, 10/03/2016 05:40 या दिवशी प्रकाशित केले.
जातो सूर्य झाकोळून ही किमया वेळाची, पाश येते आवळून काळभूल अंधाराची... दाराआड दडती स्वप्नं मन भरारी आभाळी, पंख छाटता दयावंत शाप मिरवू कपाळी... येता डोळ्यांत कणव कुणा जन्मीचे ऋण, किती फेडू म्हणता भर पडते नवीन... बेड्या घालून चालती इथे सारेच बंदी, मुक्त होऊन रांगती त्याला म्हणती छंदी... अशी सरता सरेना वाट दाट वणव्याची, भिजलेल्या हुंदक्यांना खोड भारी चालण्याची...
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2361
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

वा!

अशी सरता सरेना वाट दाट वणव्याची, भिजलेल्या हुंदक्यांना खोड भारी चालण्याची...
जबरदस्त! आवडली कविता! Sandy

अप्रतिम !!

बेड्या घालून चालती इथे सारेच बंदी, मुक्त होऊन रांगती त्याला म्हणती छंदी...
अहाहाहाहा सुपर्ब.

इस कवितामें जान हैं!!

चांगली कविता. आवडली. पैजारबुवा,