Skip to main content

जगण शिकतोय मी आता.......!

लेखक एकप्रवासी यांनी रविवार, 06/03/2016 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
जगण शिकतोय मी आता जुनी कात टाकून, अंकुरापरी मातीतून पुन्हा उगवून काही नवीन तारा जोडून जगण्याची नवीन धून बनवून, जुन्याच शब्दांना जराशी वेगळी चाल देवून, जगण शिकतोय मी आता…. सुखानं सुखाशी थोड गुणून दुखांना दुखाशी घेतलं भागून, बाकी काही उरेल ना उरेल आयुष्याच गणित पाहतोय पुन्हा सोडवून, जगण शिकतोय मी आता…. स्वप्नांना जरा पुन्हा जाग करून तुटलेल्या वाटां सांकवाना जोडून, निशब्द नात्यांना हळुवारपणे पुन्हा पुन्हा हसवून, जगण शिकतोय मी आता…. चुकांना किती जायचो घाबरून अपयशाला रोज कंटाळून हार जीत आता खूप दूर राहिलेत मी प्रयत्नांनाच बसतो कवटाळून, जगण शिकतोय मी आता….
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1521
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

मला वाटलं कोणा जगन नावाच्या मित्राला हाक मारताहेत ते! ;-)

In reply to by एस

थोडया शाब्दिक चुका समजून घ्याल हि अपेक्षा आहे.

In reply to by एकप्रवासी

एकवेळ गद्यात शाब्दिक चुका क्षम्य आहेत पण पद्यात असू नयेत नाहीतर अर्थच बदलतो हो. अगदी मोकलाया दाही दिशा होऊन जातं.

"जगणं" च लिहायचं होत, चुकून जगण लिहिलं गेलंय.