मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुनियादारी....

पिके से पिके तक.. · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
ना शाळेत शिकवली, ना कोलेजात शिकवली, ही तर दुनियादारी आहे, आम्हाला या दुनियेनी शिकवली.... वाटेत होता वाटसरू , म्हणालो मदत तुम्हा काय करू, ऐकवले प्रवचन म्हणे इथे तिथे तोंड नको मारू, दोस्त होता पुढे , आनंद होता मला, दुनियादारी म्हणते तू मागे तर तो पुढे कसा काय गेला, ती पण गेली सोडून वाटेत मला अर्ध्यावरती, म्हणे दुनियादारी शिक, तू तर आहे फारच सरळ सोबती, मग काय किताब होती मोठी , दुनियादारी शिकत गेलो, कधी याचे तर कधी त्याचे पाय ओढत गेलो, वाईट नव्हतो कधीच, खूप पहिली होती आम्ही दुनियादारी बस कळली आम्हास जेव्हा संपली होती आमच्यासाठी दुनिया सारी..........

वाचने 2277 वाचनखूण प्रतिक्रिया 10

तुषार काळभोर 12/02/2016 - 17:07
"दोस्त होता पुढे , आनंद होता मला, दुनियादारी म्हणते तू मागे तर तो पुढे कसा काय गेला," >> हे एकदम भिडलं ब्वॉ आपल्याला!! (तेव्हढं शुद्धलेखन बघा.. मदत इथे आहे.)

चांदणे संदीप 12/02/2016 - 18:04
सदस्यत्व घेतल्यापासून ३ तासाच्या आत कविता टाकल्याबद्दल तुमचे सर्वात आधी अभिनंदन! कारण, इथे बर्याच नवीन सदस्यांना आठवडा किंवा महिनाही लागतो! मला स्वत:ला जवळपास एक वर्ष लागले! ;) आता पुढचा रेकॉर्ड पाहूया काय असेल! बादवे, कविता चांगली आहे! :) Sandy

एकप्रवासी 14/02/2016 - 12:07
तुमच्याच कवितेवरून काही ओळी आठवल्या …. "सगळ्यांनाच शिकावी लागते दुनियादारी एकाच चष्म्यातून पाहावी लागते दुनिया सारी" खूप छान आणि वस्तुस्थितीशी निगडीत आहे कविता………… आवडली.