Skip to main content

दुनियादारी....

लेखक पिके से पिके तक.. यांनी शुक्रवार, 12/02/2016 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
ना शाळेत शिकवली, ना कोलेजात शिकवली, ही तर दुनियादारी आहे, आम्हाला या दुनियेनी शिकवली.... वाटेत होता वाटसरू , म्हणालो मदत तुम्हा काय करू, ऐकवले प्रवचन म्हणे इथे तिथे तोंड नको मारू, दोस्त होता पुढे , आनंद होता मला, दुनियादारी म्हणते तू मागे तर तो पुढे कसा काय गेला, ती पण गेली सोडून वाटेत मला अर्ध्यावरती, म्हणे दुनियादारी शिक, तू तर आहे फारच सरळ सोबती, मग काय किताब होती मोठी , दुनियादारी शिकत गेलो, कधी याचे तर कधी त्याचे पाय ओढत गेलो, वाईट नव्हतो कधीच, खूप पहिली होती आम्ही दुनियादारी बस कळली आम्हास जेव्हा संपली होती आमच्यासाठी दुनिया सारी..........
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2284
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

"दोस्त होता पुढे , आनंद होता मला, दुनियादारी म्हणते तू मागे तर तो पुढे कसा काय गेला," >> हे एकदम भिडलं ब्वॉ आपल्याला!! (तेव्हढं शुद्धलेखन बघा.. मदत इथे आहे.)

मस्त!

आयडी रोचक आहे. अर्थ कळेल काय?

सदस्यत्व घेतल्यापासून ३ तासाच्या आत कविता टाकल्याबद्दल तुमचे सर्वात आधी अभिनंदन! कारण, इथे बर्याच नवीन सदस्यांना आठवडा किंवा महिनाही लागतो! मला स्वत:ला जवळपास एक वर्ष लागले! ;) आता पुढचा रेकॉर्ड पाहूया काय असेल! बादवे, कविता चांगली आहे! :) Sandy

तुमच्याच कवितेवरून काही ओळी आठवल्या …. "सगळ्यांनाच शिकावी लागते दुनियादारी एकाच चष्म्यातून पाहावी लागते दुनिया सारी" खूप छान आणि वस्तुस्थितीशी निगडीत आहे कविता………… आवडली.