✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भय वाटते

म — मनमेघ, गुरुवार, 12/24/2015 - 12:29
ही बंधने आता तुटायाचे मला भय वाटते, ही बंधने आता तुटायाचे मला भय वाटते! क्षण गुंतुनी जातोय जो पुढच्या क्षणी निःशब्दसा त्याने युगांनाही लुटायाचे मला भय वाटते! बंदिस्त माझे जाहले आहेत स्वर काचांतुनी मी गाउ जाता त्या फुटायाचे मला भय वाटते!! हा दाटला काळोख माझ्या भोवती चोहीकडे धमन्यातला पारा सुटायाचे मला भय वाटते!! आहे वसंताचा ऋतू अजुनी कितीतरी दूरसा अन पाकळ्या माझ्या नटायाचे मला भय वाटते!! -मनमेघ टीप- ही गझल नाही. गझल सारखी वाटत असली तरीही. तेव्हा तंत्राचा मुद्दा बाजूला ठेवून वाचावीत ही नम्र विनंती.

प्रतिक्रिया द्या
1495 वाचन

💬 प्रतिसाद (3)

क्लास!!!!

पालीचा खंडोबा १
गुरुवार, 12/24/2015 - 12:58 नवीन
क्लास!!!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम !

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 12/24/2015 - 15:55 नवीन
अप्रतिम !
आहे वसंताचा ऋतू अजुनी कितीतरी दूरसा अन पाकळ्या माझ्या नटायाचे मला भय वाटते!
कसले अप्रतिम लिहिले आहे ! ह्यातल्या एकेक कडव्यावर एकेक गोष्ट लिहिता येईल इतका खोल आषय आहे ! मस्तच ! लिहित रहा अन मुख्य म्हणजे इथे लिहित रहा !
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मनमेघ
Fri, 12/25/2015 - 17:38 नवीन
पालीचा खंडोबा, प्रगो प्रतिसादाबद्दल धन्यवाद. प्रगो, नक्की लिहितो इथे:-)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा