तिची एक आठवण.......
लेखनविषय:
तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
एका अबोल सांजवेळेत रमणारी
आयुष्यातले रंग मुक्त उधळीत
मनाच्या क्षितिजावर मालवत जाणारी......तिची एक आठवण
तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
अवचित मला एकाकी गाठणारी
आवेगाच्या धुक्यात मला लपेटून
भुतकाळाच्या दरीत खोल उतरणारी.........तिची एक आठवण
तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
अवखळ अल्लड सरींनी सजणारी
सारा आसमंत भिजवून जाताना
पाऊलखुणा नजरेत साठवून जाणारी........तिची एक आठवण
तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
बंद मुठीतल्या चंचल वाळुपरी
लाख अडवून धरले तरी
निर्विकारपणे अलगद निसटत जाणारी........तिची एक आठवण
वाचने
5138
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
आठवणींची कविता... सुंदर !
वा!
वा खूप छान कविता..
मनपुर्वक आभार
सुंदर!!
In reply to सुंदर!! by सूड
सूडक्याला आवडली म्हणजे भारी
In reply to सूडक्याला आवडली म्हणजे भारी by अभ्या..
नसत्या जिलब्यांपेक्षा नक्कीच
In reply to नसत्या जिलब्यांपेक्षा नक्कीच by सूड
नक्कीच चांगलं आहे.
आवडली
कविता आवडली.
वा!
In reply to वा! by चांदणे संदीप
सॅण्डीबाबा, त्यांचे खरे नाव
In reply to सॅण्डीबाबा, त्यांचे खरे नाव by अभ्या..
हा...हा..
In reply to वा! by चांदणे संदीप
नक्कीच
In reply to नक्कीच by एक एकटा एकटाच
धन्यवाद!
Mast...
छान कविता
सुरेख.
धन्यवाद
आवडली
कविता आवडली!
कविता आवडली!
मस्तच
छानच
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
वाह.