तिची एक आठवण.......
तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
एका अबोल सांजवेळेत रमणारी
आयुष्यातले रंग मुक्त उधळीत
मनाच्या क्षितिजावर मालवत जाणारी......तिची एक आठवण
तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
अवचित मला एकाकी गाठणारी
आवेगाच्या धुक्यात मला लपेटून
भुतकाळाच्या दरीत खोल उतरणारी.........तिची एक आठवण
तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
अवखळ अल्लड सरींनी सजणारी
सारा आसमंत भिजवून जाताना
पाऊलखुणा नजरेत साठवून जाणारी........तिची एक आठवण
तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
बंद मुठीतल्या चंचल वाळुपरी
लाख अडवून धरले तरी
निर्विकारपणे अलगद निसटत जाणारी........तिची एक आठवण
आठवणींची कविता... सुंदर !
वा!
वा खूप छान कविता..
मनपुर्वक आभार
सुंदर!!
सूडक्याला आवडली म्हणजे भारी
नसत्या जिलब्यांपेक्षा नक्कीच
नक्कीच चांगलं आहे.
आवडली
कविता आवडली.
वा!
सॅण्डीबाबा, त्यांचे खरे नाव
हा...हा..
नक्कीच
धन्यवाद!
Mast...
छान कविता
सुरेख.
धन्यवाद
आवडली
कविता आवडली!
कविता आवडली!
मस्तच
छानच
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
वाह.