तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
एका अबोल सांजवेळेत रमणारी
आयुष्यातले रंग मुक्त उधळीत
मनाच्या क्षितिजावर मालवत जाणारी......तिची एक आठवण
तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
अवचित मला एकाकी गाठणारी
आवेगाच्या धुक्यात मला लपेटून
भुतकाळाच्या दरीत खोल उतरणारी.........तिची एक आठवण
तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
अवखळ अल्लड सरींनी सजणारी
सारा आसमंत भिजवून जाताना
पाऊलखुणा नजरेत साठवून जाणारी........तिची एक आठवण
तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
बंद मुठीतल्या चंचल वाळुपरी
लाख अडवून धरले तरी
निर्विकारपणे अलगद निसटत जाणारी........तिची एक आठवण
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5230
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
आठवणींची कविता... सुंदर !
आठवणींची कविता...
सुंदर !
वा!
वा!
वा खूप छान कविता..
वा खूप छान कविता..
मनपुर्वक आभार
मनपुर्वक आभार
सुंदर!!
सुंदर!!
सूडक्याला आवडली म्हणजे भारी
In reply to सुंदर!! by सूड
सूडक्याला आवडली म्हणजे भारी असणारच शुअर.
आहेच.
सध्या चांगले चांगले कवि येताहेत ब्वा. ते उध्दवराव पण भारी लिहून राह्यले.
नसत्या जिलब्यांपेक्षा नक्कीच
In reply to सूडक्याला आवडली म्हणजे भारी by अभ्या..
नसत्या जिलब्यांपेक्षा नक्कीच चांगलं आहे की अभ्या!!
नक्कीच चांगलं आहे.
In reply to नसत्या जिलब्यांपेक्षा नक्कीच by सूड
नक्कीच चांगलं आहे.
बाकी दाद कवितेबरोबरच तुझ्या दर्दी (कवितेच्या बाबतीत) पणाला आहे हे सांगणे न लगे.
आवडली
आवडली
कविता आवडली.
कविता आवडली.
वा!
भारीच!
३ए सर, ही कविता मी आमच्या हापिसच्या दिवाळी कार्यक्रमात वाचायला घेऊ का?
तुमच्याच नावाने वाचणार बर्का.... माझ्या नावावर नाही खपवणार! ;-)
सॅण्डीबाबा, त्यांचे खरे नाव
In reply to वा! by चांदणे संदीप
सॅण्डीबाबा, त्यांचे खरे नाव विचारुन घे रे बाबा व्यनि करुन.
नाहीतर तुझ्या हपिसातले म्हणायचे किती हे एकटेपण.
हा...हा..
In reply to सॅण्डीबाबा, त्यांचे खरे नाव by अभ्या..
नाव विचारायला मी एकटाच जाऊ का अजून दोन एकटे सोबत घेऊन जाऊ असा प्रश्न पडलाय आता? ;-)
नक्कीच
In reply to वा! by चांदणे संदीप
मला ही आवडेल.
धन्यवाद!
In reply to नक्कीच by एक एकटा एकटाच
धन्यवाद! ___/\___
Mast...
Mast...
छान कविता
आवडली.
सुरेख.
आवडली.
धन्यवाद
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
आवडली
आवडली
कविता आवडली!
कविता आवडली!
कविता आवडली!
मस्त
मस्तच
मस्त कविता.
असेच लिहित जा.
छानच
छानच
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
वाह.
खूप सुन्दर कविता.