Skip to main content

चकती वाचे

लेखक निनाद यांनी मंगळवार, 20/10/2015 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
अनंतवर्ती अनभिसंहित अनमोल माहिती चकती वाचे अनापरीवर्तक अनालेखित पंक्ती अनुज्ञापन अनुक्रिया अनुदेशन ही पद्धती अनुनयी अनुमोदनात अनेकोत्तरी रीती अन्योन्य धारिता क्षीणनकारी अन्वस्ती अनेकोत्तरी अन्वस्तीय धागे तरी भीती अपच्छेद अपरा अनुरूपता असे अवनति अनुवाद असे अप्रारुपी शोधू तरी किती अवरक्त विदा अवरोधितात का भिंती अवश्लेष्मल तरी अवाढव्य असे माहिती (पैसा ताईंनी आठवण करून दिली... त्यामुळे भोगा आय मिन वाचा! :) )
लेखनविषय:

वाचने 5388
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

भोगली…आय मीन वाचली! मस्तच!
अवश्लेष्मल तरी अवाढव्य असे माहिती
हे आवडले! ह्यावरून काहीतरी सुचले आहे! घेऊन येईन कधीतरी नंतर! ;-) Sandy

In reply to by चाणक्य

चर्चा करण्यासारखे काय आहे हो? चर्चा करायला घाबरतो हो मी. हवे तर एखादे उत्तर टाका... ते अजून आवडेल. ;)

=)) या देवी सर्वभूतेषु भ्रांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः!! अवांतरः वाचली का? चला पैसे वाचले!

निनाद, तुमची हार्डडिस्कवरची कविता मस्तंच आहे! थोडी विस्कटून घ्यायचा प्रयत्न केला. ------------------- प्रयत्नसीमा ------------------ अनंतवर्ती = भरपूर सेक्टर्स असलेली अनभिसंहित = ? अनफॉर्मॅटेड ? अनपार्टिशन्ड ? अनइंडेक्स्ड ? अनमोल माहिती = तेच चकती वाचे = तेच अनापरीवर्तक = ? अनालेखित पंक्ती = नॉन इंडेक्स्ड डेटा लाईन्स अनुज्ञापन अनुक्रिया अनुदेशन ही पद्धती = ? रीडिंग च्यानेल ? अनुनयी अनुमोदनात अनेकोत्तरी रीती = ? ब्लॉक रीडिंग ? अन्योन्य धारिता = युनिक फाईल क्षीणनकारी अन्वस्ती = ? अनेकोत्तरी अन्वस्तीय धागे = ? मल्टिपल रीडंडंट च्यानेल ? तरी भीती = तेच अपच्छेद = फ्रॅगमेंटेशन अपरा अनुरूपता = रीडंडन्सी असे अवनति = तेच अनुवाद असे अप्रारुपी = ? फाईल अॅलोकेशन टेबलची कॉपी ? शोधू तरी किती = तेच अवरक्त विदा = मेमरी लीक अवरोधितात का भिंती = तेच अवश्लेष्मल = ? अनऑर्गनाईझ्ड ? गार्बेज हीप ? तरी अवाढव्य असे माहिती = तेच ------------------- प्रयत्नसीमा ------------------ चुकलंमाकलं सांभाळून घ्या आणि यत्न गोड मानून घ्या. पूर्ण स्पष्टीकरण वाचायला आवडेल! :-) आ.न., -गा.पै.