माणूस
बराच अवधि गेल्यावर्ती
हर्ष मनी दाटला
हरवलेला माणूस पुन्हा
रस्त्यावरती भेटला
कसलीही ना चाहुल देता
पाठलाग त्याचा केला
थोड़े अंतर राखून तेव्हा
नवा प्रवास झाला
भुकेलेल्या जिवास पाहून
पानी डोळ्यात दाटल
होत न्हवत शिदोरितल
सार त्याने वाटल
हतबल उभ्या रस्त्यालगत
अंधाकड़े पाहता
पळत जाऊन पुसल त्याने
सांग कुठे राहता?
दमून भागून शेवटी बसता
रोजच्या गाडीत जाऊन
वृद्ध दिसले उभे कुणी
उठला जागा देऊन
पाहून सार ओशाळल्याने
मनी विचार आला
कधी काळचा आपल्यातला तो
माणुस कुठे गेला
कल्पना
"सारं त्यानं वाटलं"
छान लिहिले आहे.
एक नंबर अप्रतिम लिहिलेय
खुपच छान ... अप्रतिम