चाहुल-
डोळ्यांत श्रुंगार भरताना,
सौभाग्याचं लेणं लेताना,
भरजरी शालू
सैरभर नजर
हिरवा चुडा
जरीचा पदर
फुललेला
तिथेच असेल कुठेतरी मी
नि:शब्द आणि गहिवरलेला...
.
.
उत्फुल्लं-
भरत्या सागरास पाहताना,
आहोटिला चंद्र वाहताना,
चमचम मोती
अवखळ किनारा
भरली मासोळी
वादळी वारा
सुटलेला.
तिथेच असेल कुठेतरी मी
तुझ्याच प्रितीत रमलेला...
.
.
भणंग-
आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलताना,
मागे वळून पाहताना,
पहाटेचा सडा
बाभळीच झाडं
उजाड माळरान
पाण्याचा माठ
भरलेला.
तिथेच असेन मी कुठेतरी,
तुझ्याचसाठी हरवलेला...
काव्यरस
वाचने
2475
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
हि कशी सुटली....
छान आहे.
:-)
In reply to हि कशी सुटली.... by एक एकटा एकटाच
:-)
सुरेख! खुप आवडली.
सुरेख! खुप आवडली.
सुंदर आहे!
सुंदर आहे!
फक्त, 'असेल' च्या ऐवजी 'असेन' हा शब्द हवा होता.
हो बरोबर..
In reply to सुंदर आहे! by डॉ सुहास म्हात्रे
हो बरोबर..
'असेन' पाहिजे होतं पहिल्या दोन कडव्यांतही. अनवधाने झालं बहुतेक.
वा ! सुंदर!!!!
वा ! सुंदर!!!!
छान आहे.
छान आहे.