Skip to main content

रुसवा

लेखक ऊध्दव गावंडे यांनी सोमवार, 23/02/2015 00:41 या दिवशी प्रकाशित केले.

बरं नाई हे रुसनं
मुकं मुकाट बसनं
डोया भिळूनं डोयातं
थोळं गालात हासनं

असा कसा हा रुसवा
होटं टाकला शिऊनं
नको धरुस अबोला
देतं काऊनं भिऊनं ?

लाली दिसते साजरी
तुह्या फुगल्या गालाची
कायं फिकीरं सांगना
तुले माया या हालाची ?

अशी लाळा ची तू मैंना
तयं हातावर्ला फोळं
लाऊ जीवं मी कितीकं
सांगं कायं तुले थोळं ?

बस्सं झालं पुरं झालं
चाल्ला जीवं खोलं खोलं
देनं सोळूनं रुसवा
आता बोलनं गोळ गोळं

लेखनविषय:

वाचने 5884
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

कविता आवडली.

शेवटची ओळ वाचून 'सोनू, तुला भरवसा नाही काय' हे लोकगीत आठवले :-) .


अशी लाळा ची तू मैंना
तयं हातावर्ला फोळं
लाऊ जीवं मी कितीकं
सांगं कायं तुले थोळं ?

अतिशय सुंदर... पार आतून आलेली दिसतेय...


मस्त. आवडली कविता.

गोनीदांची 'पूर्णामायची लेकरं' वाचल्यापासून वर्‍हाडी बोली अधिकाधिक आवडायला लागलीय.


लाली दिसते साजरी
तुह्या फुगल्या गालाची
कायं फिकीरं सांगना
तुले माया या हालाची ?

झ-का-स ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राती... अर्ध्या राती... असं सोडुन जायाचं न्हाय ! ;) { बेLa }