एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.
एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.
एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी.
एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.
एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.
एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.
एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4503
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
हर्षद, ही
हाण्णं !!
In reply to हर्षद, ही by सुचेल तसं
तुम्ही नका
In reply to हाण्णं !! by केशवटुकार
म्हणजे हे
In reply to तुम्ही नका by सुचेल तसं
अहो
In reply to म्हणजे हे by ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो कविता
कुठे आहे रे सम्पादक मंडळ ?
थोड्यात गोडी नाही?
प्रेयसी कडून