Skip to main content

"जेसन आणि बोलती बेडकी"

लेखक पदकि यांनी शनिवार, 14/02/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सिलिकॉनदरीत/वसे तो जेसन शिका हा लेसन / तरुणींनो त्याच्या डोक्यामध्ये / आज्ञावली फक्त संगणकी रक्त/ खेळतसे रस्त्याने चालता / एका प्रात:काली बेडकी बोलली / शेजारून "अरे राजपुत्रा/ राजकन्या मीही बेडकाचे देही/ शापग्रस्त मला उचलून / स्वगृही नेशील आणिक घेशील / चुंबन ते प्रगटेल माझे / मानवी शरीर "कामा" स उशीर / मग नाही जन्मभर तुझी/ होईन मी कांता आनंदा अनंता/ मुकू नको " जेसनने तिला / मग उचलले आणिक ठेविले / खिशामाजी घरामध्ये तिला / दिले छोटे घर खायलाही चार / किडे बिडे आठवडे झाले/ कित्येक दिसांचे पण चुंबनाचे / नाव नाही बेडकी अखेर/ झालीसे हताश स्वरात निराश / प्रश्न करी "अरे प्रिय मित्रा/ चुंबनाचे काय धरिते मी पाय/ आता तुझे. कर मला पुन्हा/ अरे अहंमन्या सुंदर ती कन्या/ लवकर देईन तुजला / असा कामानंद सोड बाकी छंद / कुचकामी" ऐका तरुणींनो / काय तो वदला संगणकामधला / अभियंता "नव्याने मिळाला / मला हा प्रोजेक्ट कोटींचे बजेट / डॉलरचे मरायला इथे/ मला नाही वेळ चुंबनाचे खेळ / कशासाठी? किडे बिडे देतो/ सुखामध्ये रहा समोरचा पहा / टीव्ही सुद्धा" रागाने मग ती / बेडकीही कापे आणिक संतापे/ प्रश्न करी "विवाही जीवन / मनात नव्हते आणले ते येथे / कशासाठी?" जेसन वदला / "कारण असे की बोलती बेडकी /दुजी नसे " ----
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2630
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

छान

:)))) !!! काय सुंदर बांधली आहे कविता! सल्ल्युट भाय! सल्ल्युट!

शालेत जेव्हा /शिके हा जेसन टाळे तो लेसन / कवितांचे जाई सर्व इच्छा / लयास त्याच्या भाषा विषयाच्या /कंटाळून वाचिता वाटे / उतारा तो गूढ उठे मस्तकशूल / अर्थापायी वाचील्या तयाना / जरी तासंतास अर्थ तो काही / उमगेना परीक्षे ग्लानी / येई तयांस स्पष्टीकरणंपाई / संधार्भासाहित जाळू वाटे मग / भाषेचे पुस्तक माथी बट्टा जरी / अडाण्याचा मिपाघरी कविता / सुलभीकरण एकमेव कारण / कवित्वास माझ्या