टॉरेंटगाथा

स्वामी संकेतानंद जे न देखे रवी...
ह्या प्रकाराला ’पोस्टमॉडर्नोत्तर काव्य’ म्हणतात म्हणे. म्हटलं आपणही पाडून बघावी एक पोएम. तर ताजी ताजी पाडलेली ही रेसिपी चाटुनि आता बघणे. डार्केस्ट क्लाउडी राती लैपटॉप मांडी असतो लेटेस्ट कोणती मूव्ही मी लगेच आयमडिबतो* टॉरेंट साइटी जाता मी हज़ार नावे बघतो वेचून क्लीन टॉरेंटा सीडणारि* तेची धरतो डाऊनलोडुनी घेतो बँडविड्थ सारी युझुनी रात्रीच पाहुनी मूव्ही गूगलून घेतो अजुनी पिंगूनि मित्र तो बोले ’पाहिलास मूव्ही अमका?’ देऊन आणखी लिंका आणवेल मोठा झटका ’येईल तो नवा सीझन्‌*’ ’एपिसोड आला बघ रे’ यूट्यूब वर चाले गाणी बँडविड्थ सारी विसरे डाऊनलोडण्याची ही सूटणार नाही व्यसने टॉरेंट-कुंपणी ’स्वामी’ थांबवाल आता चरणे? -- स्वामी संकेतानंद, नवी दिल्ली, १३-०९-२०१४ -------------------------------------------------------- कठीण शब्दांचे अर्थ( हे लैच शाळकरी होतंय, पण.......) आयमडिबणे = imdb.com वर सिनेमाचे रेटिंग/रिव्ह्यू/प्लॉट समरी बघणे सीडणारि = चांगला seed count असणारी टॉरेंट सीझन = इंग्रजी मालिकांचे पर्व.
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

13 टिप्पण्या 3,055 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

स्वामी संकेतानंद नवीन

In reply to by काळा पहाड

प्रायोगिक काव्य असल्याने आवडणे, न आवडणे सापेक्ष आहे. चालायप्रति:) प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

अत्रुप्त आत्मा नवीन

डाऊनलोडुनी घेतो बँडविड्थ सारी युझुनी रात्रीच पाहुनी मूव्ही गूगलून घेतो अजुनी
=))))) स्वामिज्जी की म'हान रचनांएं। =))

पैसा नवीन

लै भारी! रेशिपी सगळी ईटली. आणि लाईकली सुद्धा!! =)) बाकी ब्रॉडब्यांड कुंपणीचा असेल तर त्या कुंपणी चरणे बर्‍याच जणांना परवडते. स्वतःचे पैशे कोण बर्नायला सिटलाय?? =))