ह्या प्रकाराला ’पोस्टमॉडर्नोत्तर काव्य’ म्हणतात म्हणे. म्हटलं आपणही पाडून बघावी एक पोएम. तर ताजी ताजी पाडलेली ही रेसिपी चाटुनि आता बघणे.
डार्केस्ट क्लाउडी राती
लैपटॉप मांडी असतो
लेटेस्ट कोणती मूव्ही
मी लगेच आयमडिबतो*
टॉरेंट साइटी जाता
मी हज़ार नावे बघतो
वेचून क्लीन टॉरेंटा
सीडणारि* तेची धरतो
डाऊनलोडुनी घेतो
बँडविड्थ सारी युझुनी
रात्रीच पाहुनी मूव्ही
गूगलून घेतो अजुनी
पिंगूनि मित्र तो बोले
’पाहिलास मूव्ही अमका?’
देऊन आणखी लिंका
आणवेल मोठा झटका
’येईल तो नवा सीझन्*’
’एपिसोड आला बघ रे’
यूट्यूब वर चाले गाणी
बँडविड्थ सारी विसरे
डाऊनलोडण्याची ही
सूटणार नाही व्यसने
टॉरेंट-कुंपणी ’स्वामी’
थांबवाल आता चरणे?
-- स्वामी संकेतानंद,
नवी दिल्ली,
१३-०९-२०१४
--------------------------------------------------------
कठीण शब्दांचे अर्थ( हे लैच शाळकरी होतंय, पण.......)
आयमडिबणे = imdb.com वर सिनेमाचे रेटिंग/रिव्ह्यू/प्लॉट समरी बघणे
सीडणारि = चांगला seed count असणारी टॉरेंट
सीझन = इंग्रजी मालिकांचे पर्व.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3059
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
जल्ला काय जम्ला नाय हां.
प्रायोगिक काव्य असल्याने
In reply to जल्ला काय जम्ला नाय हां. by काळा पहाड
वाहवा.... आवल्डी कविता...
हा हा हा ... झक्कास !!
डाऊनलोडुनी घेतो
हाहाहाहा!
स्वत:चे पैसे बर्नायला पण
In reply to हाहाहाहा! by पैसा
झक्कास बे
सकलटॉरेंटयूजरहृदयगाथाच की हो.
क्लासच ! खल्लासच !
In reply to सकलटॉरेंटयूजरहृदयगाथाच की हो. by बॅटमॅन
हेहे.. बरोबर..
In reply to सकलटॉरेंटयूजरहृदयगाथाच की हो. by बॅटमॅन
लाइकली आहे टाॅरेन्टगाथा!
धन्यवाद मंडळी ! _/\_