शब्दांत गुंफले मी
हळुवार जाणिवांना
स्पर्शून अर्थ दे तू
माझ्या मुक्या भावनांना..||धृ||
मज स्मरणात आज ही रे
ती संध्या भारलेली
संग लाभला तुझा अन
काय माझी मोहरली
जणू चैत्र वणवा विझावा
वळवाच्या सरींनी भिजताना
स्पर्शून अर्थ दे तू
माझ्या मुक्या भावनांना.. ||१||
हे बंध जे जगाचे
पायात घोळणारे
माझी अबोल प्रीती
जणू भिन्न दोन्ही किनारे
दिसतो तुझाच चेहरा
माझे प्रतिबिंब पाहताना
स्पर्शून अर्थ दे तू
माझ्या मुक्या भावनांना.. ||२||
मी जाणते सख्या रे
तव चिंतनी मी आहे
होकार मनी जपते
डोळ्यात लाज आहे
झणी टिपूनी घे ओठांनी
विरहाच्या आसवांना
स्पर्शून अर्थ दे तू
माझ्या मुक्या भावनांना..||३||
डोळे लागले प्रिया रे
वाटेकडे तुझ्या रे
ये झडकरी घे लवकरी
कवेत मज सख्या रे
तुज पाहण्याची लालसा
मिटनाऱ्या पापण्यांना
स्पर्शून अर्थ दे तू
माझ्या मुक्या भावनांना.. ||४||
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1894
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आवडल.
आभार
In reply to छान आवडल. by जेपी
पुढील कवितेच्या प्रतिक्षेत.
In reply to छान आवडल. by जेपी
छान
धन्यवाद... आभारी आहे.
In reply to छान by स्वप्नज
सुंदर
एकच शंका